राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन ७ मार्च रोजी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

पाचोरा ( प्रतिनिधी) येथील महालपुरे मंगल कार्यालय येथे सोमवार 7 मार्च रोजी दुपारी एक वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जळगाव जिल्हा पक्ष निरीक्षक अविनाश राव आदिक यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी आमदार दिलीप वाघ. गटनेते संजय वाघ .यांच्या मार्गदर्शनाने मेळावा साठी मार्गदर्शन करणार आहेत. आगामी जिल्हा परिषद ,पंचायत समिती, आणि नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कार्यकर्त्यांशी हितगुज करण्यासाठी भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते ,नगरसेवक पदाधिकारी तसेच महिला, युवा, व्यापारी, शेतकरी ,आघाडीच्या सर्व पदाधिकारी व फ्रेंडस चे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होण्याचे आवाहन विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे. तालुका अध्यक्ष विकास पाटील. शहराध्यक्ष अझहर खान. महिला राष्ट्रवादी पदाधिकारी रेखाबाई पाटील ,युवकांचे प्रमुख अभिजित पवार. यांनी केले आहे