पाचोरा न.पा च्या दुर्लक्षाने जारगांवात जिंवत झरा :लाखों लिटर च्या नासाडीला जबाबदार कोण? कॉंग्रेस आंदोलनाच्या पवित्र्यात

पाचोरा नपा च्या दुर्लक्षाने जारगांवात जिंवत झरा :लाखों लिटर च्या नासाडीला जबाबदार कोण? कॉंग्रेस आंदोलनाच्या पवित्र्यात

पाचोरा (प्रतिनिधी) – शहरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते तर प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारामुळे जारगांवात जिवंत पाण्याचा झरा वाहतो. लाखो लिटर पाण्याची नासाडीला जबाबदार कोण असा संतप्त सवाल करीत कॉंग्रेस आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

शहरातील सिंधी कॉलनी, कृष्णापुरी भागात पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी जारगांव शिवारात हायवे लगत फुटली आहे. या पाईप लाईन मधुन जेव्हा पाणी पुरवठा सिंधी कॉलनी च्या जलकुंभाला पुरवठा होतो तेव्हा येथुन मोठ्या प्रमाणावर पाणी निघुन सरळ जारगांवातील नुराणी नगर परीसरातील नागरिकांनाच्या दुकानात आणि घरात पोहचत आहे. गल्लीतुन हे पाणी पुन्हा हिरवा नदी पात्रात जात आहे. येथील नागरिकांनी पाचोरा नगर परिषदेला तक्रार केली मात्र पुन्हा संबंधित कर्मचाऱ्यांनी याच ठिकाणी भलामोठा विस फुटाचा खड्डा करुन काम अर्धवट सोडून दिल्याने लहान मुलांना धोखा निर्माण झाला आहे. सदरची तक्रार कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या कडे करताच श्री सोमवंशी यांनी या ठिकाणी भेट दिली यावेळी ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पाणी पुरवठा बंद झाल्यावर खड्डय़ातील घाणीचे पाणी सरळ पुन्हा पाईपलाईन मध्ये जाते आणि तेच पाणी पुढे नवीन पाणी पुरवठा सुरू केल्यावर सिंधी कॉलनीच्या जलकुंभात हे पाणी जात आहे. या पाईपलाईन फुटलेल्या जागेवर दोन विद्युत पुरवठा चे पोल आहेत ते कधीही खाली कोसळतील अशी परिस्थिती झाली आहे. पाचोरा नगर परिषद च्या संबंधित अधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन पाणी पुरवठा ची फुटलेली पाईप लाईन जोडावी अन्यथा कॉंग्रेस आंदोलन करेल असे सचिन सोमवंशी यांनी म्हटले असुन तसे निवेदन न. पा. प्रशासनाला देण्यात येणार आहे. एकीकडे शहरातील नागरिकांनी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे तर दुसरीकडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी गेल्या दिड महीन्या पासून होत आहे याला जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई मागणी कॉंग्रेस ने केली आहे.