महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता संघर्ष समिती महावितरण जळगांव परिमंडळ कार्यालय समोर द्वार सभा घेऊन निदर्शने करण्यात आली

दि.२५/०३/२०२२
महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता संघर्ष समिती

तर्फे राज्य पातळीवर ऊर्जा मंत्री व महावितरण, महानिर्मिती व महापारेषन प्रशासनास दि.२८.०१.२०२२ रोजी दिलेल्या नोटीसनुसार
१.महावितरण कंपनीच्या विभाजनाचा निर्णय रद्द करणे.
२.जलविद्युत प्रकल्प महानिर्मिती कंपनीच्याच ताब्यात ठेवणे .
३.महाराष्ट्रातील ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे ‘
फ्रैंचाईझी धोरण रद्द करणे.
४.तिन्ही क़पन्यांमधील सुत्रधारी कंपनीचा वाढता हस्तक्षेप तात्काळ बंद करावा.
५. तिन्ही कंपन्या मध्ये काम करीत असलेले कंत्राटी आऊट सोर्सिंग कामगारांना वयाच्या ६० वर्ष पर्यंत संरक्षण देणे.
६. केंद्र सरकारच्या विद्युत विधेयक २०२१ दुरुस्ती रद्द करणे.

या प्रमुख मागण्यांसाठी आज २५/०३/२०२२ रोजी संध्याकाळी १८.०० वाजता महावितरण जळगांव परिमंडळ कार्यालय समोर द्वार सभा घेऊन निदर्शने करण्यात आली.एकुण २५ संघटनांची अभेद्य एकजुट यानिमित्ताने सज्ज झाली.केंद्र सरकार व राज्य सरकारचे खाजगीकरण व फ्रैंचाईझीकरण करण्याचे व भांडवलशाही ला प्रोत्साहन देऊन जनतेच्या सार्वजनिक मालकीच्या उद्दयोगांचे खच्चीकरण करून कामगार कर्मचारी व सामान्य जनता यांना देशोधडीला लावण्याचा धोरणाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवण्यात येऊन घोषणाबाजी करण्यात आली. सरकार राज्याचे असो की केंद्राचे कामगार कर्मचारी यांना प्रतिकूल निर्णय घेऊन चळवळ मोडीत काढण्याचा डाव असफल करण्यासाठी प्रखर विरोध नोंदवणे अत्यावश्यक असल्याची भावना तीव्रतेने प्रकट होत आहे. सार्वजनिक उद्योग सहित वीज उद्योग खाजगीकरण झाल्यास त्याचे विपरीत परिणाम सामान्य ग्राहक, लघु उद्योजक, शेतकरी यांना मिळणारे अनुदान बंद होऊन, मनमानी पद्धतीने दर आकारणी होऊन भोगावे लागतील. आझाद मैदान येथे झालेल्या आंदोलनात माननीय ऊर्जा राज्य मंत्री यांनी १६ शहराचे खाजगीकरण करणार नसल्याचे जाहीर केले होते, परंतु संघर्ष समिती सोबत कोणतीही चर्चा अथवा बैठक न घेता छुपा अजेंडा राबविण्याचा प्रयत्न चालवला असून कामगार संघटनांशी धोका असल्याची भावना तीव्रतेने जाणवत आहे. खाजगीकरण हे कामगार विरोधी व देश विरोधी आहे.त्यामुळे संघर्ष समिती च्या नियोजित कार्यक्रम नुसार पुढील टप्प्यात २८ आणि २९ मार्च २०२२ रोजी दोन दिवसीय संप १०० टक्के यशस्वी करण्यासाठी ८६००० कामगार कर्मचारी अधिकारी अभियंता यांनी कंबर कसली आहे.

आज च्या द्वारसभेत महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन तर्फे कॉ.विरेंद्र पाटील ,सबॉर्डीनेट ईंजिनिअर्स असोसिएशन तर्फे श्री पराग चौधरी,कुंदन भंगाळे , विद्युत क्षेत्र तांत्रिक युनियन रविंद्र पाटील , प्रदीप पाटील,बहुजन विद्युत अभियंता कर्मचारी फोरम तर्फे श्री.विजय सोनवणे ,महाराष्ट्र राज्य बहुजन वीज कर्मचारी संघटना तर्फे श्री सुरेश गुरचळ महाराष्ट्र राज्य विद्युत ऑपरेटर संघटना हिरालाल पाटील ,पावर फ्रन्ट युनियन संतोष सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले,यांचे सोबत शेकडो कामगार कर्मचारी अधिकारी अभियंते यांनी सहभाग नोंदवला

विरेंद्र पाटील ,परीमंडळ सचिव
महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन जळगांव ९४२२७७८६६.