पाचोऱ्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून स्वर्गीवासी तात्यासाहेब आर.ओ पाटील यांचे जुने फोटो व्हायरल

पाचोऱ्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून स्वर्गीवासी तात्यासाहेब आर.ओ पाटील यांचे जुने फोटो व्हायरल!

पाचोरा प्रतिनिधी-आज २३ एप्रिल २०२३ रोजी पाचोरा शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सभा होत आहे. या सभेआधी आमदार किशोर पाटील यांनी आरोप केला होता की, ठाकरे कुटुंबातील व उद्धव बाळासाहेब ठाकरे आर.ओ तात्या मुंबई येथे उपचार घेत असताना उद्धव ठाकरे यांनी साधा एक फोन सुद्धा केला नाही किंवा आर.ओ तात्या यांना भेटायला वेळ दिला नाही नव्हता तसेच ठाकरे कुटुंबातील कोणी सदस्य विचारलं नाही होते, आर.ओ तात्यासाहेब यांची प्राण जोत मावळली तरी पण उद्धव साहेब यांना वेळ नाही नव्हता पण आज सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो मुळे शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. त्या फोटो मध्ये स्पष्ट दिसत असून तात्यासाहेब संजय राऊत यांच्या सोबत गप्पा मारत आसताना दिसून येत आहे तसेच वैशालीताई सूर्यवंशी यांचा सोबत चर्चा करताना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे,रामदास कदमसह अन्य पदाधिकारी दिसत आहेत. या फोटो मुळे आ.किशोर पाटील यांना घरचा आहेर भेटला असून अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.