पाचुंदा ते बाबिरदेव रथयात्रेद्वारा पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन

पाचुंदा ते बाबिरदेव रथयात्रेद्वारा पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) देवगड संस्थानचे प्रमुख गुरुवर्य ह.भ.प.भास्करगीरी महाराज यांच्या प्रेरणेने आणि ह.भ.प.स्व. काशिनाथ महाराज शिंदे यांच्या आशीर्वादाने व पाचुंदा येथील बाबीरबुवा संस्थानचे प्रमुख मानकरी बाबासाहेब महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नेवासा तालुक्यातील पाचुंदा ते इंदापूर तालुक्यातील रुई येथील क्षेत्र बाबीरदेव येथे रथयात्रेद्वारा 16 ते 25 जुलै 2025 या कालावधीत पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दिंडीतील दैनंदिन कार्यक्रम असे आहेत दररोज पहाटे 4 ते 6 काकड आरती,7ते11 वाटचालीचे भजन, दुपारी 11ते2 भोजन व विश्रांती, दुपारी 3ते6 वाटचालीचे भजन, सायंकाळी 6ते7 हरीपाठ, रात्री 7ते8 भोजन व विश्रांती अशी दैनंदिन कार्यक्रमाची रुपरेषा ठरवन्यात आली आहे. बुधवार दिनांक 16जुलै रोजी सकाळी सोन्याबापू शिंदे, लक्ष्मण पांढरे, बाबासाहेब घुले आणि मोरे परीवाराच्या वतीने नाष्टा देउन पाचुंदा येथुन प्रस्थान होणार आहे.दुपारी माका येथील निलेशशेठ महारनोर,ह.भ.प. नारायण महाराज गायके, सोपान भवार,केरू भवार, नारायण भवार,यांच्या वतीने दुपारचे भोजन देण्यात येणार आहे.खोसपुरी येथे सायंकाळी ह.भ.प.आव्हाड महाराज यांच्या वतीने चहापाणी तर बाळूमामा देवकर यांच्या वतीने बाळूमामा मंदिरात मुक्काम होणार आहे. गुरुवार सकाळी जेऊर येथे गणेश दारकुंडे यांच्या वतीने चहापाणी होउन धनगरवाडी येथे बाळासाहेब नजन यांच्या वतीने नाष्टा देण्यात येणार आहे. दुपारी शेंडी येथे आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या वतीने भोजन देण्यात येणार आहे.सायंकाळी सारोळा येथे अंबादास बोरूडे,भगवान बोरुडे ,पांडुरंग बोरुडे परीवाराच्या वतीने रात्रीचे भोजन देऊन शुक्रवारी सकाळी चहा नाष्टा देण्यात येणार आहे.दुपारी वाळुंज येथे गणेश पठारे आणि भाउ आडसुळ यांच्या वतीने भोजन देण्यात येणार आहे.रात्री रूईछत्तिसी येथे मोहनराव जगदाळे साहेब यांच्या वतीने भोजन देण्यात येणार आहे.शनिवारी सकाळी राळेगण फाटा येथे भाऊसाहेब माने, अर्जुन शिंदे, भगवान शेळके यांच्या वतीने नाष्टा होउन दुपारी सांगवी येथे जेउरच्या बाळू बनकर यांच्या वतीने भोजन देण्यात येणार आहे.रात्री मांदळीच्या आत्माराम बाबा मठात मुक्काम होणार आहे.पुढे ही दींडी थेरगाव, शिंदेगाव,कोपर्डी, धालवाडी,राक्षसवाडी, वैसेवाडी खेड,औटेवाडीफाटा, भिगवन,बंडगरवाडी, पिलेवाडी,मोहरी आणि रूई या मार्गाने जाणार आहे.शुक्रवार दिनांक 25 जुलै 2025 रोजी सकाळी ह.भ.प. आदिनाथ महाराज निकम यांचे काल्याचे किर्तन होउन नंतर जालींदर ससे, रामदास गर्जे यांच्या काल्याच्या महाप्रसादाच्या पंगतीचे या सोहळ्याची सांगता होणार आहे. या दिंडी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांनी 16जुलै रोजी सकाळी आठ वाजता आपले प्रवासातील साहित्य सोबत घेऊन बाबीरदेव मंदिरात उपस्थित रहावे असे आवाहन बाबीरबुवाजी भक्त मंडळ आणि समस्त पाचुंदा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.काही अडचण असल्यास मायनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पाचुंदा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.