पाचोरा इस्कॉन तर्फे आज पासून दोन दिवस धार्मिक सोहळा

पाचोरा इस्कॉन तर्फे आज पासून दोन दिवस धार्मिक सोहळा

पाचोरा येथील इस्कॉन शाखेच्या वतीने आज मंगळवार दिनांक 21 पासून भगवान श्री जगन्नाथ मंदिर लोकार्पणा निमित्ताने दोन दिवशीय धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प पू अनंतशेष दासजी महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वरखेडी रोड भागात उभारण्यात आलेल्या श्री जगन्नाथ मंदिरात सोमवारी सकाळी प पू अनंतशेष दासजी महाराज यांनी धार्मिक सोहळ्या संदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार घेतली. याप्रसंगी प पू चैतन्य जीवनप्रभू, अमृतदासजी नानकर ,रमेश मोर, जगन्नाथयात्रा दासजी महाराज, अशोक महाजन उपस्थित होते.
पाचोरा येथे रमेश मोर यांच्या योगदानातून उभारण्यात आलेल्या श्री. जगन्नाथ मंदिराच्या उभारणी संदर्भात माहिती देऊन त्यांनी स्पष्ट केले की, 21 व 22 मार्च रोजी धार्मिक सोहळा होत असून या निमित्ताने दिनांक 21 रोजी सकाळी शहरातून संगीतमय फेरी व सायंकाळी सहा वाजता श्री जगन्नाथ ,बलदेव, सुभद्रा यांचा अधिवास व किर्तन. त्यानिमित्ताने जयराम कॉलनी ते इस्कॉन मंदिरापर्यंत युवकांची बाईक रॅली. दिनांक 22 रोजी सकाळी प पू लोकनाथ स्वामीजी महाराज यांच्या आगमना निमित्ताने स्वागत व शोभायात्रा त्यानंतर सकाळी आठ ते नऊ सुदर्शन नरसिंग यज्ञ, कलश पूजन, महाअभिषेक, स्व. विद्यावती मोर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण व पूजन. सकाळी 11 वाजता प पू लोकनाथ स्वामी महाराज यांच्या अमृतवाणीतून सत्संगाचे निरूपण. दुपारी एक वाजता शृंगार दर्शन, 108 भोग, महाआरती व महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांसाठी देशभरातील इस्कॉनचे साधु संत व भक्तगण उपस्थित राहणार असून परिसरातील इस्कॉन सदस्य व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन करण्यात आले. पत्रकार परिषद सुमारे तासभर चालली. अशोक महाजन यांनी आभार मानले.