शिवसेनेचे वन मंत्री संजय राठोड यांनी त्वरित राजीनामा द्यावा व पूजा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी व्हावी या मागणीसाठी भाजपाचे चोपड्यात चक्काजाम आंदोलन….

शिवसेनेचे वन मंत्री संजय राठोड यांनी त्वरित राजीनामा द्यावा व पूजा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी व्हावी या मागणीसाठी भाजपाचे चोपड्यात चक्काजाम आंदोलन….

पूजा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्यूची योग्य चौकशी व्हावी तसेच जोपर्यंत पूजा चव्हाण हिच्या मृत्यूच्या पूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत शिवसेनेचे वन मंत्री संजय राठोड यांनी त्वरित राजीनामा द्यावा या मागणीसाठी चोपडा भारतीय जनता पार्टी व महिला आघाडी यांच्या वतीने चोपडा शहरातील धरणगाव नाक्याजवळ चक्का जाम आंदोलन करण्यात आले यावेळी संजय राठोड यांच्याविरुद्ध घोषणा देण्यात आल्या व पूजा चव्हाण यांना न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आली.