पाथर्डी तालुक्यात मागासवर्गीय युवक शेतकऱ्याचा शेतातच निर्घृणपणे खून, मोठा आक्रोश करीत पोलीसांनी तपासाची चक्रे वेगानं फिरवन्याची म्रुतांच्या नातेवाईकांची मागणी

पाथर्डी तालुक्यात मागासवर्गीय युवक शेतकऱ्याचा शेतातच निर्घृणपणे खून, मोठा आक्रोश करीत पोलीसांनी तपासाची चक्रे वेगानं फिरवन्याची म्रुतांच्या नातेवाईकांची मागणी

 

(सुनिल नजन”चिफ ब्युरो”/स्पेशल क्राईम रिपोर्टर अहमदनगर जिल्हा) शेतातील शेडमध्ये राहणाऱ्या मागासवर्गीय शेतकऱ्याचा शेतातच निर्घृणपणे खून करून अज्ञात मारेकरी फरार होण्यात यशस्वी झाले आहेत.म्रुतांच्या नातेवाईकांनी आक्रोश करीत पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. या बाबतची घटना अशी की अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथे अविनाश बाळू जाधव (वय वर्षे 27)या मागासवर्गीय शेतकऱ्यांची सरकारने दिलेली वडिलोपार्जित आठ एकर शेती आहे. शेतीमध्ये फळवर्गिय झाडांची लागवड करून घास ,गिनी गवत, इतर पिके घेतली आहेत.मयत अविनाश जाधव यांच्या वडीलांचे सहा महिन्यापुर्वीच निधन झालेले आहे. किरण आणि महेश हे दोन भाउ,आई अनिता,आणि अजोबा छबुराव मारुती जाधव हे चौघेजण पुण्यातील पिंपरी चौकातील मोरगे वस्तीवरील साने काँलनीतील चौकात राहतात. मयताचे भाउ महेश बाळू जाधव हे पुणे येथे लुमँक्स कंपनीत हेल्पर म्हणून काम करतात. गावाकडील शेतात अविनाश जाधव हा एकटाच रहात होता. त्याची पत्नी सायली अविनाश जाधव ही गेल्या दीड वर्षापासून तीच्या दोन वर्षांच्या छोट्या मुलासह माहेरी पाथर्डी येथेच तीच्या आईकडेच रहात होती. त्यामुळे अविनाश हा शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये एकटाच मांडवे ता.पाथर्डी येथे रहात होता.दि.4-5-2024 रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास मयत अविनाशची आई अनिता बाळू जाधव, यांना गावातील शेजारीच राहणाऱ्या नवनाथ चंदनशिव यांनी फोन करून सांगितले की अविनाश बाबद विपरीत घटना घडली आहे.तुम्ही ताबडतोब गावाकडे निघून या.मांडवे येथे पोहोचताच तेथे अविनाश हा पालथ्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याच्या अंगावर,डोक्यावर, कोणत्या तरी धारदार हत्याराने मारहाण केल्यच्या गंभीर जखमा दिसून आल्या. तो सदरच्या जखमामुळे मयत झालेला होता. दि.3-5-2024 चे रात्री दहा वाजता ते 4-5-2024 रोजी सकाळी सातच्या दरम्यान अविनाश बाळु जाधव याचा कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी कोणत्या तरी धारदार शस्त्राने मारहाण करून खून केला आहे अशा आशयाची फिर्याद मयताचे भाउ महेश बाळू जाधव (वय25) यांनी पाथर्डी पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. याबाबत पा पाथर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 486/2024,कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पाथर्डी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी करून काहीच निष्पन्न न झाल्याने सोडून दिले आहे. पोलिसांनी घटना स्थळावरील मयताचा मोबाईल ताब्यात घेऊन कसुन चौकशी केली आहे. मयताची पत्नी ही अविनाश कडे घटस्फोट देण्यासाठी सारखी मागणी करीत असल्याची कुजबुज नातेवाईकात सुरू होती. उत्तरीय तपासणी नंतर मोठ्या शोककूल वातावरणात मांडवे येथे मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. लवकरच आम्ही मारेकऱ्यांना अटक करू अशी ग्वाही पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी दिली. दरम्यान शेवगावचे जिल्हा पोलिस उपअधिक्षक सुनिल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. मारेकऱ्यांनी एवढ्या निर्दयपणे खून का केला हे फार मोठे आव्हान पोलीसापुढे निर्माण आहे.