श्री.गो.से.हायस्कूल येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

श्री.गो.से.हायस्कूल येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

पाचोरा (प्रतिनिधी)
पा.ता.सह.शिक्षण संस्था संचलित, श्री.गो.से.हायस्कूल, पाचोरा येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती प्रसंगी प्रतिमा पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. या प्रसंगाचे औचित्य साधून शालेय आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण आयोजित केले होते.या प्रसंगी संस्थेचे चेअरमन मा. संजय वाघ, व्हाईस चेअरमन .व्ही.टी.जोशी,शालेय समिती चेअरमन .खलील देशमुख, तांत्रिक विभाग चेअरमन वासुदेव महाजन,ज्येष्ठ संचालक प्रकाश पाटील उपस्थित होते. तसेच डॉ.स्वप्निल पाटील, डॉ. नरेश गवांदे, डॉ. रुपेश पाटील, डॉ.अमोल जाधव,. ओम राठी, ओम अग्रवाल, धर्मेश अग्रवाल, उदय जोशी,अनुराग भारतीया हे सुद्धा या प्रसंगी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते शालेय मैदानात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पी.एम. वाघ,उपमुख्याध्यापक . एन. आर. पाटील, पर्यवेक्षक. आर. एल. पाटील,ए. बी. अहिरे,सौ. ए. आर. गोहिल, तांत्रिक विभाग प्रमुख एस. एन. पाटील, किमान कौशल्य प्रमुख मनिष बाविस्कर, रणजीत पाटील, कार्यालय अधीक्षक अजय सिनकर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.