श्री. सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे “चैतन्योत्सव” वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

श्री. सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे “चैतन्योत्सव” वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा 2022/23 संपन्न

 

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे “चैतन्योत्सव” वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा 2022/23 संपन्न…. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन पाचोरा-भडगाव मतदार संघाचे मा.आमदार तथा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाऊसो.दिलीप ओंकार वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समिती चेअरमन बापुसो‌.जगदीश सोनार हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.गो‌.से. हायस्कूलचे शालेय समिती चेअरमन दादासो. खलील देशमुख,शाळेचे समन्वयक श्री.एस.डी.पाटील सर,श्री.शांताराम माने सर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. अशोक परदेशी सर उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी आपल्या विविध सुप्त कलागुणांची उधळण करत ‘रंगारंग’ असे कार्यक्रम सादर केले.त्यात प्रामुख्याने विविध नाट्यछटा, एकांकिका,वैयक्तिक व सामूहिक नृत्य,बालनाटिका सादर झाल्या. पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे व्हाईस चेअरमन नानासो व्ही.टी. जोशी होते‌.तर पारितोषिक वितरण संस्थेचे चेअरमन नानासो.संजय ओंकार वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.राम मनोहर लोहिया हायस्कूलचे शालेय समिती चेअरमन अण्णासो.दगाजी वाघ,श्री.गो.से.हायस्कूलचे शालेय समिती चेअरमन दादासो.खलील देशमुख, माध्यमिक विद्यालय कुऱ्हाडचे शालेय समिती चेअरमन आप्पासो.सतीश चौधरी,संचालक दादासो. अर्जुनदास पंजाबी, दादासो. योगेश पाटील,श्री.एस.डी. पाटील सर,श्री.शांताराम चौधरी सर,श्री.गजानन जोशी श्री‌.वाय.ओ.पाटील सर,श्री. अनिल येवले,मुख्याध्यापक श्री‌.अशोक परदेशी सर उपस्थित होते.विद्यार्थ्यांना वर्षभरात संपन्न झालेल्या विविध स्पर्धातील यशाबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.तसेच शाळेतील श्रीमती.सारिका पाटील,श्रीमती.योगिता ठाकूर श्री‌.मनोज पवार,श्रीमती.वर्षा पाटील,श्री.स्वप्निल माने,श्री. राकेश पाटील या शिक्षक वर्गास त्यांच्या विविध यश- निवडीबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानित आले.मान्यवर व मा.अध्यक्षांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थी व शिक्षक वर्गाचे कौतुक व अभिनंदन करत शालेय कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.अशोक परदेशी सर व सांस्कृतिक समिती प्रमुख श्रीमती.उज्वला साळुंखे मॅडम यांनी तर सूत्रसंचालन श्री.दीपक पाटील,श्रीमती.वर्षा पाटील श्री.मनोज पवार,श्री.स्वप्निल माने,श्रीमती.योगिता ठाकूर, श्री.ईश्वर पाटील,श्री.संदीप वाघ,श्रीमती.चारुशीला पाटील मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.अभिजीत महालपुरे सर यांनी केले. कार्यक्रमासाठी बहुसंख्येने पालक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.