आखतवाडे गावाला कायम स्वरूपी थ्रीफेज लाईट द्या उपसरपंच दिपक गढरी यांचे कार्यकारी अभियंता पाचोरा यांना निवेदन

मौजे आखतवाडे गावाला कायम स्वरूपी थ्रीफेज लाईट मिळण्यासाठी उपसरपंच दिपक गढरी यांचे कार्यकारी अभियंता पाचोरा यांना निवेदन

पाचोरा तालुक्यातील मौजे आखतवाडे गावाला कायमस्वरूपी थ्री फेज वीज मिळावी यासाठी आखतवाडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री दीपक गढरी यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाचोरा वीज मंडळाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले

त्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की महोदय मौजे आखतवाडे तालुका पाचोरा जिल्हा जळगाव गावामध्ये आजतागायत सिंगल फेज लाईट असून त्यामुळे गावामध्ये विद्युत उपकरणे सुरू करण्यास मोठी अडचण निर्माण होते सिंगल फेज वीज वारंवार कमी जास्त होत असल्यामुळे अनेक विद्युत उपकरणे वारंवार जळून जातात व सिंगल फेज लाईट असल्यामुळे ग्रामस्थांना अनेक प्रकारचा अडचणींचा सामना करावा लागतो आजूबाजूच्या गावांमध्ये थ्री फेज लाईटची व्यवस्था झालेली असताना फक्त आखतवाडे गावावरच अन्याय का लवकरात लवकर गावात कायमस्वरूपी 24 तास थ्री फेज लाईटची व्यवस्था करण्याबाबतची निवेदन देण्यात आले आहे व तात्काळ माननीय कार्यकारी अधिकारी पाचोरा येत्या काही दिवसात आखतवाडे गावाच्या थ्री फेज लाईटच्या काम सुरू होणार असल्याचे सांगितले आहे निवेदनावर सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामसेवक यांच्या सह्या आहेत.