राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ ची स्वराज्य प्रेरणा चारशे वर्षा नंतरही आज ही तितकीच प्रेरणादायी अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल देशमुख

राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ ची स्वराज्य प्रेरणा चारशे वर्षा न नंतरही आज ही तितकीच प्रेरणादायी

डॉ.अनिल देशमुख जिल्हाध्यक्ष
अखिल भारतीय ग्राहक पंचायत पाचोरा येथे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व राष्ट्रीय युवा दिंन स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधत राष्ट्रमाता जिजाऊ ,स्वामी विवेकनंद व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम कोवीड पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या निर्बंध चे पालन करीत फक्त मोजक्या कार्यकर्त्या च्या उपस्थितीत उत्सवात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थित मान्यवरांचे शब्दसुमनानी श्री शरद गीते संघटक अखिल भारतीय ग्राहक पंचायत पाचोरा यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश पूजन व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ च्या प्रतिमा पूजन व पुष्पहार डॉ. अनिल देशमुख जिल्हाध्यक्ष यांचे हस्तेअर्पण करून दीपप्रज्वलन केले तर स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार श्री. चींधू मोकळ तालुकाध्यक्ष व क्रांती ज्योती सावित्रिबाई फुले यांचे प्रतिमेला पुष्पहार डॉ.एन. आर.पाटील कृषी समिती प्रमुख यांनी केले.
या प्रसंगी राष्ट्रमाता जिजाऊ ह्या स्वातंत्र्य ,स्वराज्य विचारांचे प्रेरणा होत्या आजही चारशे वर्षां नंतरही तेवढेच प्रेरणादायी आहेत असे गौरवद्गार डॉ.अनिल देशमुख जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत जळगाव व आजचा विश्र्व्यापक व स्वालंबी विचारांचे समर्थक स्वामी विवेकानंद यांची जयंती आपण राष्ट्रीय युवा दिंन म्हणून व स्री शिक्षण च्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचेही प्रतिमा पूजन करून आजच्या युगात ही महिला सबलीकरण किती महत्वाचे आहे असे प्रतिपादन डॉ.अनिल देशमुख यांनी केले.
या नंतर सेल्फ डिफेन्स कराटे असोसिशन चे सचिव राजेन्द्र पाटील ,तालुका संघटक शरद गीते , स्वप्निल पाटील,संजय पाटील,वैद्यकीय समिती प्रमुख डॉ.मुकेश तेली नैनव , कन्हैया देवरे आदी पदाधिकारी व सदस्य यांनीही प्रतिमा पूजन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ.अनिल देशमुख जिलाध्यक्ष ,तालुका अध्यक्ष श्री चिंधू भाऊ मोकल ,तालुका संघटक शरद गीते ,कृषी समिती प्रमुख डॉ.एन आर पाटील ,वैद्यकीय समिती प्रमुख डॉ. मुकेश तेली नैनाव,स्वप्नील पाटील, कनैया देवरे,संजय पाटील आदी सदस्य पदाधिकारी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांचे आभार तालुकाध्यक्ष चींधु भाऊ मोकळ यांनी केले.