के सी ई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात शिक्षक पालक सभा उत्साहात संपन्न
के सी ई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात शिक्षक पालक सभा उत्साहात संपन्न :के सी ई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकी च्या विद्यार्थ्यांकरिता शिक्षक पालक सभेचे आयोजन केले गेले. त्यात विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्तपने प्रतिसाद दिला . नुकतेच कॉलेज सुरु होऊन अभ्यासक्रमावर प्रथम घटक चाचणी घेण्यात आली . त्यात विद्यार्थ्यांना मिळालेल्या प्रत्येक विषयाचे पेपर दाखवून मिळालेल्या गुणाचे व विद्यार्थ्यांना होण्याऱ्या शैक्षणिक समस्यांचे निरसन करून मार्गदर्शन करण्यात आले . प्रत्येक विषय शिक्षकाने विद्यार्थी व पालक यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला .महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी , अकॅडमिक डीन डॉ प्रज्ञा विखार,प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा .के बी पाटील यांनी पालकांशी सवांद केला आणि मार्गदर्शन केले . शिक्षक पालक सभेला विषय शिक्षक प्रा. पूजा मराठे ,प्रा.मधुमती अहिरराव , प्रा . दिनेश अहिरराव .प्रा विजय चौधरी ,प्रा.कल्पना राठोड,प्रा.डॉ एस.आर. पाटील. प्रा स्वाती बाविस्कर व प्राध्यापक वृंद ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.