मराठा बांधवांवर झालेल्या अमानुष लाठी चार्जचा पाचोऱ्यात जाहीर निषेध

मराठा बांधवांवर झालेल्या अमानुष लाठी चार्जचा पाचोऱ्यात जाहीर निषेध

पाचोरा: दिनांक 02/09/2023 आज रोजी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजातील आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठी चार्जचा शिवसेना नेत्या उबाठा सौ. वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी, जिल्हाप्रमुख दीपक सिंग राजपूत, उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे व शेतकरी सेना जिल्हाप्रमुख अरुण पाटील यांच्या नेतृत्वात माननीय तहसीलदार पाचोरा ता. पाचोरा जिल्हा जळगाव यांना निवेदन देण्यात आले. जालना येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत असलेल्या आंदोलकांना पोलिसांनी अमानुष केलेली मारहाणी घटना अतिशय दुर्दैवी आहे, अतिशय संताप जनक आहे. मराठा आरक्षण हा राजकीय विषय नाही तर हा समाज हिताच्या विषय आहे. हा लाठीचार्ज नाही तर आंदोलन कर्त्यांवर शासन प्रणित हल्ला आहे. माता-भगिनींवर हात उचलणाऱ्या सरकारचा व पोलिसाचा धिक्कार असो.मानव हिताला न शोभणारी घटना जालन्यात घडली आहे. त्या घटनेच्या निषेध करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पाचोरा आणि अंगीकृत संघटना यांच्या वतीने सदर घटनेच्या तीव्र निषेध नोंदवीत आहोत. सदर आंदोलनात महिला मुली हे देखील होते त्यांना देखील पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली. महिला व पुरुष जखमी झाले. सदरची घटना ही खूप निंदनीय आहे, महाराष्ट्र हे महिलांना आदर करणारे राज्य आहे परंतु सध्याचे असंवेदनशील, निगरगठ्ठ सरकार आहे. सदर पोलीस प्रशासनाने केलेल्या अमानुष लाठी चार्जची चौकशी होऊन संबंधितावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही व्हावी असे न झाल्यास उबाठा शिवसेना पाचोरा रस्त्यावर उतरेल व त्यांच्या होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. असे निवेदन देण्यात आले प्रसंगी वरिष्ट नेते रमेश बाफना जी, तालुकाप्रमुख शरद पाटील, शहर प्रमुख अनिल सावंत, शहर प्रमुख दीपक पाटील, शहर संघटक राजेंद्र राणा, शहर संघटक दत्ताभाऊ जड़े, शहर संघटक दादाभाऊ चौधरी, शहर प्रमुख भरत खंडेलवाल, युवा सेना तालुकाप्रमुख शशिकांत पाटील, युवा सेना शहर प्रमुख मनोज चौधरी, उप जिल्हा संघटिका तिलोंत्तामा मौर्य, राजेंद्र भोसले, एडवोकेट अभय पाटील, प्रवीण पाटील, मंदाकिनी पारोचे, कुंदन पंड्या, जयश्री येवले, अनिता पाटील महिला आघाडी, जिभाऊ पाटील, ज्ञानेश्वर पाटील, पप्पू जाधव, हिलाल पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, युवराज धोबी, विलास पाटील, महेंद्र पाटील, प्रवीण शिंपी, धनराज पाटील, संतोष पाटील, मुनीर तडवी, शेख हाफिज, राहुल चौधरी, दीपक भोई, भारत पाटील, गौरव पाटील, साईनाथ राठोड, समाधान हटकर, भाऊसाहेब पाटील, तुळशीराम पाटील, निलेश गवळी, दादाभाऊ गवळी, संतोष कदम, दीपक मुळे, देविदास सावळे, विठ्ठल एरंडे, जिभाऊ पाटील, सागर पाटील, सुनील देवरे, नितीन लोहार, गोकुळ गांगुर्डे, अजय पाटील, नाना वाघ, संतोष सर, एडवोकेट किशोर पाटील, राजू गायकवाड, धर्मसिंग पाटील, डीडी नाना, शुभम पाटील सह पदाधिकारी व कार्यकर्ते आणि मराठा बांधव उपस्थित होते.