उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम

जळगाव, दि. 16 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शुक्रवार दि.17 डिसेंबर 2021 रोजीचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे.
शुक्रवार दि. 17 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.55 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन. नंतर मोटारीने प्रयाण. सकाळी 8.15 वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 8.55 वा मोटारीने प्रयाण. सकाळी 9.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आगमन. सकाळी 9.00 वा. जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा आढावा व जळगाव जिल्ह्यातील कोविड-19 विषाणू प्रादूर्भाव व उपाययोजनांचा आढावा. सकाळी 10.50 वा. मोटारीने प्रयाण. सकाळी 11.00 वा. जळगाव जिल्हा दुध संघाचे आवार, शिवाजीनगर, जळगाव येथे आगमन. सकाळी 11.00 वा. जळगाव जिल्हा सहकारी दुग्ध उत्पादक संघ मर्यादित, जळगाव- नवीन आधुनिक दूध प्रक्रिया व पॅकींग प्लँट आणि नविन दुग्धजन्य पदार्थ उत्पादन प्लँटचा उदघाटन सोहळा. दुपारी 12.20 ते 1.00 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 1.00 वा. मोटारीने प्रयाण. दुपारी 1.30 वा. सरदार वल्लभभाई पटेल पुतळा जवळ भुसावळ जि.जळगाव येथे आगमन. दुपारी 1.30 वा भूसावळ नगर परिषद आयोजित विविध कामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा. दुपारी 2.40 वा. मोटारीने प्रयाण. दुपारी 2.45 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान (डी.एस.हायस्कुल ग्राऊंड, भुसावळ) येथे आगमन. दुपारी 2.45 वा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जळगाव जिल्हा आयोजित कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा. दुपारी 4.10 वा. मोटारीने प्रयाण. दुपारी 4.15 वा. शॉप नं. 5-6, नवशक्ती आर्केड, जामनेर रोड, भुसावळ जि.जळगाव येथे आगमन. दुपारी 4.15 वा. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या नूतनीकृत संपर्क कार्यालयाचे उदघाटन (फीत कापणे), दुपारी 4.25 वा मोटारीने प्रयाण. सायंकाळी 5.00 वा. जळगाव विमानतळ येथे आगमन. दुपारी 5.15 वा. विमानाने प्रयाण.