रेल्वे प्रवास बंद असल्याने डोंगरगाव च्या कामगारांना पोटासाठी जीव गमवावा लागला

रेल्वे प्रवास बंद असल्याने डोंगरगाव च्या कामगारांना पोटासाठी जीव गमवावा लागला

जळगाव (प्रतिनिधी) – गेल्या वर्ष भरापासुन रेल्वे प्रवास अपडाउन साठी बंद असल्याने डोंगरगाव च्या कामगारांना दैनंदिन प्रवास क्रुझर चा जीवावर उठला काळाने घाला घातला असुन अपघातात तिन ठार तर दहा जखमी झाले आहेत जखमीत दोन गंभीर धुळे येथे रवाना झाले आहेत.

मनमाड येथील मालधक्क्यावर मजुरी चांगली मिळते या आशेपोटी पाचोरा तालुक्यातील अनेक कामगार हे कामासाठी रेल्वेने अपडाउन नियमित करीत असत. कोरोना महामारी चे निमित्त पुढे करुन वर्षे भरापासुन रेल्वे प्रशासनाने अपडाउन चा प्रवास बंद केल्याने गेल्या काही दिवसांपासून हे कामगार खाजगी क्रुझर गाडीत प्रवास करीत होते. आज दि. १ डीसेंबर रोजी मनमाड येथुन क्रुझर गाडी क्रमांक एम एच १३ एसी ५६०४ यातुन प्रवास करीत असतांना सदर गाडीचा अपघात होवुन गाडीने पलटी मारल्या या अपघातात तीन कामगार जागेवर ठार झाले तर तीन गंभीर जखमी झाले तर इतरही आठ जखमी झाले आहेत. मयतात नाना उर्फ भाउलाल भास्कर कोळी (४०) विकास जलाल तडवी (२९) दोघे रा. डोंगरगाव तर एक मयत मुक्तार तडवी सार्वे प्रबो हे जागीच ठार झाले तर युनुस अल्लारखाँ तडवी, चंदन हरीश खाटीक, समाधान नारायण पाटील हे गंभीर जखमी असल्याने त्यांना धुळे येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. तर जवळपास आठ जणांना चाळीसगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान मयतांची ओळख पटत नव्हते पाचोरा तालुका कॉंग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी तात्काळ डोंगरगाव सह इतरांना संपर्क करुन घटनास्थळी पाठवले असता डोंगरगाव चे गजानन पाटील, दिपक वाळके, भानुदास पाटील, गणेश पाटील, किरण पाटील, सुनील पाटील, धनराज पाटील, दत्तु पाटील हे चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्यावर मयतांची ओळख पटली. डोंगरगाव च्या घटनास्थळी धाव घेणार्‍या मध्ये डोंगरगाव चे काही युवक काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. गाडी चालक बापु सुभाष पाटील होता ही घटना परीसरात समजताच पाचोरा तालुक्यात शोककळा पसरली. दोन दिवसात पाचोरा तालुक्यात अपघातात आठ जण ठार झाले आहेत.

कोरोना चे लॉकडॉऊन उघडुन सहा महिनेहुन होवुन संपुर्ण भारत उघडला मात्र रेल्वे प्रशासनाने जादा भाडे आकारणी करुन त्यात गाड्या विषेश केल्या आहेत त्यात अपडाउन व सामान्य तिकीट बंद ठेवले आहे. जर रेल्वे प्रशासनाने पुर्ववत सेवा सुरू ठेवली असती तर पाचोरा तालुक्यातील कामगारांना जीव गमवावा लागला नसता अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी दिली असून केंद्रीय रेल्वे मंत्री यांना निवेदन देवुन तात्काळ रेल्वे ची जनरल व अपडाउन प्रवासी सेवा सुरू करण्याची मागणी करणार आहेत