जि.प. केंद्र प्राथमिक शाळा, सोयगाव येथे भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
सोयगाव दत्तात्रय काटोले
या प्रसंगी केंद्र शाळा सोयगाव येथील विद्यार्थ्यांनी
सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रेरणादायी भाषणे तसेच
शैक्षणिक व समाजप्रबोधनात्मक नाटिका सादर केल्या.
विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून
स्त्री शिक्षणाचे महत्त्व, सामाजिक समता
आणि सावित्रीबाई फुले यांचे क्रांतिकारी विचार प्रभावीपणे मांडण्यात आले.
कार्यक्रमाला शिक्षकवर्ग व शाळेतील उपस्थितांनी
विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले.
शिक्षणातूनच परिवर्तन शक्य आहे
हा संदेश या उपक्रमातून ठळकपणे देण्यात आला.

























