नानासाहेब प्रतापराव पाटील यांच्यावतीने कोळगाव महाविद्यालयास प्रतिमा भेट

नानासाहेब प्रतापराव पाटील यांच्यावतीने कोळगाव महाविद्यालयास प्रतिमा भेट….!!!!!!

आमडदे (भडगाव) – कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,कोळगाव ता.भडगाव येथील कला व विज्ञान महाविद्यालयास स्व.तात्यासाहेबांच्या २१ व्या पुण्यतिथीदिनी आमडदे ता.भडगाव येथे स्व.तात्यासाहेब हरि रावजी पाटील,स्व.कमलताई हरि पाटील,स्व.युवराज हरि पाटील,स्व.अशोक हरि पाटील,स्व.साधनाताई पाटील यांच्या प्रतिमा जळगाव जिल्हा बँकेचे संचालक तथा संस्थेचे चेअरमन आदरणीय प्रतापराव पाटील यांनी प्र.प्राचार्य संदीप बाविस्कर यांना तसेच संपूर्ण स्टाफच्या हाती सुपूर्द करण्यात आल्या.
यावेळी कृषी उपसंचालक अनिलजी भोकरे,डॉ.अनंत पाटील,जि.प.प्राथमिक शिक्षणाधिकारी विकासराव पाटील,जळगाव जिल्हा दूध फेडरेशनच्या संचालिका डॉ.पुनमताई पाटील,अव्वर सचिव प्रशांतराव पाटील,प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार आदि मान्यवर उपस्थित होते.