बुलढाण्याच्या जिजाऊच्या लेकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नवी जबाबदारी – “निर्मलाताई तायडे” यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अकोला जिल्हा निरीक्षक पदी निवड

बुलढाण्याच्या जिजाऊच्या लेकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नवी जबाबदारी – “निर्मलाताई तायडे” यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अकोला जिल्हा निरीक्षक पदी निवड

 

बुलढाणा (श्री महेंद्र बेराड प्रतिनिधी):

बुलढाणा जिल्ह्यात आपल्या प्रखर आणि समाजाभिमुख कार्यामुळे ओळख निर्माण केलेल्या तरुण तडफदार धडाडीच्या महिला नेत्या सौ. निर्मलाताई गणेश तायडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आणखी एक मोठा सन्मान मिळाला आहे. पक्षश्रेष्ठींनी त्यांची अकोला जिल्हा निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

 

निर्मलाताई तायडे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश सचिव पदावर कार्यरत असून, त्यांनी आतापर्यंत पक्षाच्या विविध उपक्रमांतून महिलांना संघटित करण्याचे आणि ग्रामीण भागात पक्षाचे कार्य बळकट करण्याचे मोठे योगदान दिले आहे.

 

या नियुक्तीबद्दल निर्मलाताईंनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, तसेच महिला प्रदेश अध्यक्षा व महिला आयोग अध्यक्षा सौ. रुपाली चाकणकर यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

 

निर्मलाताई म्हणाल्या, “पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी जनतेच्या सेवेतून आणि महिलांच्या सक्षमीकरणातून सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करीन.”

 

या यशानंतर बुलढाणा जिल्ह्यात सर्वत्र आनंदाचे वातावरण असून, “बुलढाण्याच्या जिजाऊच्या लेकीचे हार्दिक अभिनंदन” अशा शब्दांत जनतेकडून आणि कार्यकर्त्यांकडून त्यांचे कौतुक होत आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल मासरुळ सर्कल, संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस मधील पदाधिकारी, कार्यकर्ते, त्यांचे समर्थक नातेवाईक तसेच मित्रमंडळी यांच्याकडून निर्मलाताई तायडे यांच्यावर अभिनंदन वर्षाव होत आहे.