जळगाव जिल्ह्यात नाथाभाऊंनी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिला माळी समाजाला न्याय महाराष्ट्र शासनाने पाचोरा बाजार समिती प्रशासकीय मंडळ केले जाहीर

जळगाव जिल्ह्यात नाथाभाऊंनी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिला माळी समाजाला न्याय
महाराष्ट्र शासनाने पाचोरा बाजार समिती प्रशासकीय मंडळ केले जाहीर

पाचोरा कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रशासक म्हणून महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेश अध्यक्ष व ए.एम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल महाजन यांची निवड.

पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक बॉडीची मुदत संपल्या कारणामुळे या बाजार समितीवर नवीन प्रशासकीय मंडळाची नियुक्तीची प्रक्रिया सुरू होती.ती पूर्ण होऊन या बाजार समितीवर एकूण ०७ लोकांची प्रशासक म्हणून निवड करण्यात आली. त्यामध्ये माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांची मुख्य प्रशासक म्हणून निवड करण्यात आली. तर प्रशासक म्हणून अनिल महाजन यांची निवड करण्यात आली.माजी मंत्री व बहुजनांचे नेते एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) यांनी अनिल महाजन यांची शिफारस केल्यामुळे अनिल महाजन यांची पाचोरा कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये प्रशासक म्हणून निवड करण्यात आली. अशासकीय सदस्य प्रशासक म्हणून निवड करण्यात आली यांच्या सह महाविकास आघाडीच्या पाचोरा शहरातील एकूण सहा लोकांचीही निवड करण्यात आली.

वरील निवडीसाठी सर्व स्तरातुन अनिल भाऊ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

महाराष्ट्र माळी समाज महासंघ जळगाव. व जळगाव जिल्हा माळी समाजाच्या वतीने मा.एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जाहीर आभार.