श्री गो से हायस्कूल येथील विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा

श्री गो से हायस्कूल येथील विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा

पाचोरा प्रतिनिधी
पिटीसी संचलित श्री गो से हायस्कूल पाचोरा येथील इयत्ता सातवी च्या विद्यार्थ्याचे इलेक्ट्रिकल घड्याळ अंदाजे किंमत सोळाशे नाव राज तुळशीराम ठाकरे या विद्यार्थ्याचे घड्याळ काही दिवसापूर्वी शाळेत हरवले होते परंतु सातवी फ या वर्गातील कुणाल मधुकर पाटील या विद्यार्थ्यास हे घड्याळ प्रामाणिक पणे परत करून विद्यार्थ्यास दिले यासाठी या विद्यार्थ्याने प्रामाणिकपणा दर्शवल्याने घड्याळ हरवलेल्या विद्यार्थ्याच्या पालकांनी त्या विद्यार्थ्यास भेटवस्तू देऊन त्याचा गुणगौरव केला व कौतुक केले असाच प्रामाणिकपणा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी बाळगावा असे उपस्थित मुख्याध्यापक सुधीर पाटील सर उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ पर्यवेक्षक एन आर पाटील प्रीतम सिंग पाटील सुबोध कांता यन प्रमोद पाटील यांनी व्यक्त केले विद्यार्थ्यास शाबासकी दिली याबद्दल विद्यार्थ्याचे शाळेत कौतुक होत आहे