विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत नवजीवन विद्यालयात स्पर्धा संपन्न

विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत नवजीवन विद्यालयात स्पर्धा संपन्न

पाचोरा प्रतिनिधी. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्त राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत शालेय स्तरावर विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आहे. यात इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आधुनिक भारतात महिलांचे योगदान या विषयावर चित्रकला स्पर्धा, इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाद्वारे महिलांचे सक्षमीकरण, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घोषवाक्य स्पर्धा, पथनाट्य सादरीकरण स्पर्धा यात महिलांच्या आर्थिक व सामाजिक सबलीकरण, बेटी बचाव बेटी पढाव, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या विषयावर स्पर्धा घेण्यात आल्या. प्रसंगी नवजीवन विद्यालयातील केंद्रावर नवजीवन विद्यालयातील व माध्यमिक विद्यालय कृष्णापूर येथील पस्तीस विद्यार्थ्यांची स्पर्धा संपन्न झाली. प्रसंगी पाचोरा दिवानी न्यायालयाचे न्यायाधीश एफ के सिद्दिकी, पाचोरा वकिल सघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रवीण पाटील, उपाध्यक्ष अरुण भोई, अॅडव्होकेट एस पी पाटील, अॅडव्होकेट अनुराग काटकर, तालुका विधी सेवा समितीचे सहाय्यक दीपक तायडे, स्वप्निल पाटील, यासोबतच शिक्षण विस्तार अधिकारी समाधान पाटील, नवजीवन विद्यालयाचे मुख्याध्यापक एस बी पवार, माध्यमिक विद्यालय कृष्णापुरीचे मुख्याध्यापक किरण पाटील, सहशिक्षक एम एल पाटील, विधी शाखेचे विद्यार्थी सौरभ पाटील, कु चंचल पाटील, कु अनम शेख, यासोबतच नवजीवन विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.