आधी देशसेवा आणि आता समाजसेवेचे व्रत पूढे नेणारे समाधान पाटील अभिनंदनास पात्र खासदार उन्मेश दादा पाटील यांचे गौरवोद्गार

आधी देशसेवा आणि आता समाजसेवेचे व्रत पूढे नेणारे समाधान पाटील अभिनंदनास पात्र
खासदार उन्मेश दादा पाटील यांचे गौरवोद्गार

कोठली ता. भडगाव – येथील भूमिपुत्र तथा भारतीय सेवा निवृत्त सैनिक समाधान पाटील यांनी आधी देशसेवा करीत मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी जिवाची बाजी लावली आता निवृत्ती नंतरचे आयुष्य सुखात जगता येणे शक्य असताना समाज सेवेचे व्रत हाती घेतले असून त्यांच्या हातून येत्या काळात परिसराचा समाजाचा विकास होईल अशी भावना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केली आहे. आज कोठली ता. भडगाव येथील भूमिपुत्र भारतीय सेवा निवृत्त सैनिक समाधान पाटील यांचा वाढदिवस आज रक्तदान शिबिर घेऊन साजरा करण्यात आला यावेळी झालेल्या कृतज्ञता सोहळ्यात खासदार उन्मेश दादा पाटील बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजु मामा भोळे, जिल्हा परिषद सदस्य पोपट तात्या भोळे, पाचोरा भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, भडगाव भाजपा तालुकाध्यक्ष अमोल नाना पाटील, माजी तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, रतीलाल पाटील, उत्तमराव पाटील, वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्ष डॉ. संजय पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष किरण शिंपी, सरचिटणीस नकुल पाटील, पोलिस पाटील अतुल पाटील, माजी सरपंच संभाजी पाटील, चाळीसगाव पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील, पांढरद येथील सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र पाटील, रतन दादा पाटील, रतन परदेशी बांबरुड,भाजपा बूथ प्रमूख मयूर पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.