सुजय विखे पाटील यांच्या विरोधात दंड थोपटणाऱ्यांना दोन महिन्यांत देणार धोबीपछाड ?

सुजय विखे पाटील यांच्या विरोधात दंड थोपटणाऱ्यांना दोन महिन्यांत देणार धोबीपछाड ?

(सुनिल नजन चिफ ब्युरो अहमदनगर जिल्हा) संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षात तिकीट मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुजयदादा विखे पाटील यांनीही पुन्हा भाजपचे तिकीट आपल्यालाच मिळवण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून जोरदार फिल्डींग लावलेली आहे. विरोधातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोध करणं हे साहजिकच आहे. परंतु स्वपक्षातील जिल्ह्यातील काही नेत्यांनी उघडपणे विखेपाटील विरोधात भूमिका घेत दंड थोपटल्याने त्यांना दोनच महिन्यांत धोबीपछाड देण्यात येणार असल्याचे सुतोवाच सुजय दादा विखे पाटील यांनी राहत्याच्या सभेत बोलताना सांगितले.त्यामुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपने उमेदवारी नाकारल्यास सुजय विखे पाटील हे राहता विधानसभा तर लढवणार नाहीत ना या शक्यतेने जोर धरला आहे.अहमदनगर शहराजवळ सुरू असलेल्या शिवपुत्र संभाजी हे नाट्य म्हणजे विखे पाटील विरोधकांची मोट बांधण्यासाठी केलेली व्युहरचना आहे. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.कारण या कार्यक्रमाच्या निमित्ताने कर्जत जामखेड मतदारसंघातील भाजपचे आमदार राम शिंदे, भानुदास बेरड, राहुरीचे भाजपाचे माजी आमदार चंद्रशेखर कदम,श्रीगोंद्यातील घनश्याम शेलार, राजेंद्र फाळके, बाळासाहेब सोळुंके , यांनी लावलेली हजेरी बरेच काही सांगून जाते.हा कार्यक्रम खासदार सुजय विखे पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याच्या शर्यतीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेर चे आमदार निलेश लंके यांनी आयोजित केलेला कार्यक्रम आहे.आणि या नाटकात संभाजी महाराज यांची भूमिका साकारणारे कलाकार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गटाचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे हे आहेत.यामुळे वरवर जरी सांगितले जात असले की हा कार्यक्रम राजकीय नाही तरीही या नाटकाच्या निमित्ताने विखे पाटील यांच्या विरोधात पडद्याआडुन जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.वीखेंना लोकसभेची उमेदवारी मिळूनये म्हणून काहीजण तर देव पाण्यात बुडवून बसले आहेत. विखेपाटील यांनी गेल्या वेळी विधानसभा निवडणुकीत नेमकं काय होतं या गोष्टीचं भांडवल करीत काही जण शिळ्या कढीला उत आणीत आहेत.विवेक कोल्हे यांना विखेपाटील यांना टार्गेट करण्यासाठी कोण छुप्या पद्धतीने मदत करीत आहे या गोष्टीही आता लपून राहिलेल्या नाहीत.पालकमंत्री ना.राधाक्रुष्ण विखे पाटील यांनी मात्र भाजपच्या श्रेष्ठी कडे अहमदनगर बरोबरच शिर्डीची जागाही भाजपला मिळवण्यासाठी आग्रह धरलेला आहे.सुजयविखे पाटील यांच्या ऐवजी राधाकृष्ण विखे पाटील हे दक्षिणेत उमेदवारी करतील आणि विखे पाटील देतील तोच अनुसूचित जातीचा उमेदवार शिर्डीतून निवडून आणतील .यासाठी पडद्यामागील हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्षश्रेष्ठी नेमका काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.भाजपला विखेपाटील यांना उमेदवारी नाकारल्याने दोन्ही जागेवर फटका बसु शकतो हे लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा लागणार आहे.विखे विरोधक मात्र अतिशय जोराने सक्रिय झाले आहेत हे पडद्यामागील हालचाली वरून दिसून येत आहे. त्यामुळे विखेपाटील खांदेपालट करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.