”खान्देश भूषण पुरस्कार” २०२३ यासाठी युवासेना तालुका प्रमुख भुपेश राजेंद्र सोमवंशी सन्मानित

. ”खान्देश भूषण पुरस्कार” २०२३ यासाठी युवासेना तालुका प्रमुख भुपेश राजेंद्र सोमवंशी यांना सन्मानित करण्यात आले.

 

 

दिनांक २ जुलै रोजी जळगाव येथे सप्तरंग इव्हेंट अँड मॅनेजमेंट व माऊली बहुउद्देशीय संस्था आयोजित. ”खान्देश भूषण पुरस्कार” २०२३ यासाठी युवासेना तालुका प्रमुख भुपेश राजेंद्र सोमवंशी यांना सन्मानित करण्यात आले.
वडिलांची कष्टमय शेतीची जीवनशैली आणि मोठ्या बंधूचे देशसेवेत शहीद होऊन वीरगती प्राप्त होणे या विचारांतून प्रेरणा घेऊन जय जवान जय किसान या उक्तीला साध्य केलं आणि सक्रिय राजकारणात समाजसेवेचा वसा उचलला तो म्हणजे भूपेश राजेंद्र सोमवंशी यांनी..

भूपेश सोमवंशी यांचे मूळ गाव बाळद बुद्रुक हे होय. राजकारणाचा फार मोठा वारसा या गावाला प्राप्त आहे. याच गावात लहानाचे मोठे होत नागपूर सारख्या शहरातून त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. गावाला राजकारणाचा वारसा असला तरी परिवारात राजकीय वारसा नव्हता. मात्र आपल्या अंगी असलेल्या नेतृत्वगुणातून स्वबळावर प्रगती करत आज राजकीय क्षेत्रात युवा सेनेच्या तालुकाप्रमुख पदावर भूपेश सोमवंशी आपली धुरा सांभाळत आहेत.

भूपेश सोमवंशी यांनी शेतकरी आणि सैन्य दलातील जवानांसाठी आपल्या माध्यमातून भरघोस योगदान दिले आहे. आपल्या नेतृत्वगुणातून त्यांनी अनेक मोठमोठ्या कार्यक्रमांमधून समाजातील तरुणांचे प्रतिनिधित्व केले आहे. यासोबतच जिल्ह्यातील गिरणा परिक्रमा योजना, सकाळ यीन विभागीय समर युथ कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका, तरुणाईच्या प्रश्नांना वाचा फोडणे, महिलांसाठी शासकीय योजनांचा लाभ या व अशा अनेक सामाजिक प्रश्नांमध्ये त्यांनी आपले योगदान दिले आहे.

राजकीय जिज्ञासा ठेवून समाजसेवेचा वसा उचलणारे तरुण व्यक्तिमत्व म्हणून भूपेश सोमवंशी यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या या कार्याची दखल घेत आजवर त्यांना असंख्य पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आला आहे. तरुण वयात केलेल्या त्यांच्या कार्याचा हा सन्मान आहे.

युवा सेनेच्या तालुका प्रमुख पदावरून राजकारणाच्या माध्यमातून निरपेक्ष समाजकार्याचा वारसा जपणाऱ्या भूपेश सोमवंशी यांना मानाचा मुजरा.
याप्रसंगी सुप्रसिद्ध मराठी तथा हिंदी सिनेअभिनेते श्री विजय पाटकर साहेब, पंचम कँसर हॉस्पिटल चे संचालक डॉ.अतुल भारंभे, डॉ.संभाजीराजे पाटील व सर्व पुरस्कार मानकरी व विविध क्षेत्रातिल दिग्गज हजर होते.