नांद्रा येथे शिवस्मारक समितीकडून उचित कार्य करणाऱ्या व्यक्तींचा शिव सन्मान करून गौरव

नांद्रा येथे शिवस्मारक समितीकडून उचित कार्य करणाऱ्या व्यक्तींचा शिव सन्मान करून गौरव

नांद्रा ता. पाचोरा येथे शिवजयंतीचे औचित्य साधून शिव स्मारक समिती व धर्मवीर राजे संभाजी मित्र मंडळ व ग्रामस्थ यांच्या तर्फे नांद्रा येथे या चालू वर्षात उचित कार्य करणाऱ्या व प्रामाणिकपणा दाखवणारे व साहसी वृत्ती जोपासुन उत्तम आरोग्य सेवा देणारे, जिल्ह्यात गावाचे नाव चमकवून शैक्षणिक ठसा उमटवणारे व आपण समाजाचं काही देणं लागतो या सामाजिक भावनेतून शिवस्मारक समिती यांनी त्याची दखल घेतली व अशा व्यक्तींचा सन्मान व गौरव शिवस्मारक समितीकडून स्मृतिचिन्ह व शिवभक्त सिम्बॉल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला याप्रसंगी सुरुवातीला शिवाजी महाराजांची पालखी पूजन प्रतिमापूजन माल्यार्पण व दीप प्रज्वलन झाले त्यानंतर शिवभक्त डॉ श्री वाय जी पाटील ,शिवभक्त श्री मंगेश अरुण (बबलू धोबी)
,शिवभक्त श्री रमेश माधवराव सुर्यवंशी
,शिवभक्त श्री मधुकर अरुण कुंभार,
,शिवभक्त श्री राकेश गणेश बोरसे.
यांना गौरव व सत्कार करण्यात आला याप्रसंगी डॉ वाय जी पाटील दादा यांनी साधारण तीस वर्षे आपल्या गावातील तसेच परिसरातील रुग्णांना सेवा दिली आहे तसेच कोरोना काळात देखील आजारी असुनही रुग्णांना उपचार सुरू ठेवले आज त्यांचं वय ७० च्या घरात आहे तरी देखील दे आपले कर्तव्य करतच आहेत त्यांच्या वयाचा व त्यांनी गावाला दिलेल्या आजवर सेवेचा विचार करता त्यांनी शिवकार्य केले आहे म्हणून त्यांना त्यांच्या उतार वयात देत असलेल्या सेवे बद्दल शिव च त्यांना ही शिव शक्ती देत असल्याने त्यांना शिवभक्त ही पदवी देऊन गौरवणयात आले याच बरोबर
मंगेश अरुण (बबलू धोबी) याने श्री माधवराव हिरामण सुर्यवंशी यांचे ४५ हजार रु, एका व्यक्तीची सोन्याची चैन, श्री मधुकर नारायण बागुल यांचे ३५०० रु, ठाकुर सरांचे १००० रु इस्त्री कपड्यात चुकून आलेले प्रामाणिकपणे परत दिलेयाबरोबरच
श्री रमेश माधवराव सुर्यवंशी यांनी शेतात जातांना एका गरीब गवंडी काम करणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल परत केला होता तसेच
श्री मधुकर अरुण कुंभार यांनी अनिल दादा तावडे यांचा मोबाईल रात्रीच्या वेळी शिवस्मारक समोर सापडला तो आणून दिला होता
श्री राकेश गणेश बोरसे यांनी वाशी लोकल मधे लॅपटॉप व बॅग प्रामाणिक पणे जमा करून आपले कर्तव्य बजावले यांना त्यांच्या प्रामाणिक पणामुळे या सर्वांना त्यांनी दाखवलेले प्रामाणिकपणा व साहस या मूल्यांमुळे त्यांचा गौरव शिवभक्त ही पदवी देऊन करण्यात आला याबरोबरच श्री राकेश संजय बागुल यांने मुंबई येथे कर्तव्य बजावत असतांना एका गरजू व्यक्तीला रक्तदान केले म्हणून तसेच आपल्या गावातील श्री विनोद बाबुराव बाविस्कर यांची कन्या सौ. दिपाली नगराज पाटील या ताईने गरोदरपणात अभ्यास करून नववा महिना सुरू असताना डिएड ची परीक्षा दिली व प्रथम क्रमांक मिळविला याबरोबरच स्कॉलरशिप परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक आलेला विद्यार्थी घनशाम वसंत बाविस्कर यांचाही सत्कार करण्यात आला याप्रसंगी सुभाष त्रंबक बाविस्कर, बापू सर सूर्यवंशी,विनोद तावडे,जिजाबराव पवार पोलीस पाटील किरण तावडे,सुभाष आन्ना तावडे, शिवाजी तावडे,बापू लोटन सूर्यवंशी यांच्या हस्ते सर्व सत्कारथी यांचा गौरव करण्यात आला व मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ व सर्व शिवस्मारक समितीचे सदस्य व शिव भक्त तरुण उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रास्ताविक प्रा. यशवंत पवार यांनी केली