राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण विषयावर कार्यशाळा संपन्न

राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण विषयावर कार्यशाळा संपन्न

जळगाव,  : – राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई, निवारण) अधिनियम 2013 अंतर्गत सर्व कार्यालयाच्या अंतर्गत नेमलेल्या तक्रार निवारण समिती अध्यक्ष व सदस्य यांचेसाठी येथील नियोजन भवनात कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेस अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उप वनसंरक्षक विवेक होशिंग, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास विभाग, नाशिकचे चंद्रशेखर पगारे, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, यांच्यासह स्थानिक तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष, सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी बेटी बचाओ, बेटी पढाओ अंतर्गत प्रतिज्ञा घेण्यात आली तसेच बालविवाह प्रतिबंध पोस्टरचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
या कार्यशाळेस ॲड विजेता सिंग, सहायक प्राध्यापक, मणियार लॉ कॉलेज, जळगाव यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. डॉ वनिता सोनगत, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव यांनी प्रास्ताविक करुन उपस्थितांचे आभार मानले.