वाचन संस्कृती पुन्हा विकसित व्हावी – संभाजी पाटील सर

वाचन संस्कृती पुन्हा विकसित व्हावी – संभाजी पाटील सर

मा.आमदार किशोर भाऊ दराडे (विधान परिषद सदस्य)यांच्या आमदार निधीतून त्यांनी पाचोरा तालुक्यातील 35 शाळांना प्रत्येकी 15000 रु. किंमतीची पुस्तके भेट दिली सदर कार्यक्रम कै.पि.के.शिंदे माध्यमिक विद्यालय,पाचोरा येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गिरणाई शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एस.व्ही.गीते सर यांनी केले.तर सूत्रसंचालन डी.आर.कोतकर सर यांनी केले. कार्यक्रमास मा.आमदार किशोरभाऊ दराडे यांचे स्वीय सहाय्यक श्री.हरीश मुंडे, श्री.संभाजी पाटील (माजी चेअरमन,माध्यमिक शिक्षक पतसंस्था,जळगाव),श्री.वनसे सर तसेच श्री.राकेश शहा (व्यवस्थापक,अरिहन्त पब्लिकेशन,पुणे) हे होते.कोरोना काळात गेल्या दोन वर्षापासून Online teaching यामुळे विद्यार्थ्यांचे वाचन कमी झाले आहे.त्यासाठी वाचन महत्वाचे आह असे ते म्हणाले.कार्यक्रमास तालुक्यातील ज्या शाळांना पुस्तके मंजूर करण्यात आली होती त्या शाळांचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक उपस्थित होते.आभार प्रदर्शनाचे काम व्ही.पी.देशमुख सर यांनी केले.