अमोल भाऊ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महिला बचत गटांचा मेळावा

अमोल भाऊ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महिला बचत गटांचा मेळावा

———————————————————-
भाजपा महिला आघाडी चा स्वावलंबन उपक्रम
———————————————————-

पाचोरा –
येथील भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष- युवानेते अमोल भाऊ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा महिला आघाडी पाचोरा-भडगाव तर्फे दिनांक १४ नोव्हेंबर रोजी महिला बचत गटांसाठी मोफत उद्योग मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे.त्यासाठी उद्योग मैत्रीण मासिकाच्या संपादिका *सारिका भोईटे-पवार* यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन या वेळी लाभणार आहे.

भाजपा तालुकाध्यक्ष युवा नेते अमोल भाऊ शिंदे यांच्या तर्फे आयोजित विविध प्रेरणादायी कार्यक्रमाद्वारे अनेक समाज प्रबोधनपर , सामाजिक, अध्यात्मिक, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा विषयक अशा विविध कार्यक्रमांचे नेहमीच आयोजन करण्यात येते. यावर्षी वाढदिवसा निमित्त पाचोरा शहर अंतर्गत महिला बचत गटातील महिलांसाठी या विशेष उद्योग मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक 14 नोव्हेंबर 2021, रविवार , रोजी दुपारी 3:00 वाजता, महाल पुरे मंगल कार्यालय, भडगाव रोड, पाचोरा, येथे हा मेळावा संपन्न होणार आहे. पाचोरा शहरातील सर्व महिला बचत गट , तसेच विविध व्यवसायिक, लघुउद्योग, गृह उद्योग करू इच्छिणाऱ्या माता भगिनींनी, सारिका भोईटे-पवार यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा ,असे आवाहन भाजपा महिला आघाडी पाचोरा-भडगाव वतीने करण्यात आले आहे.