पाचोरा तालुक्यात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा टप्पा – शेतपाणंद रस्त्याच्या कामाचे आज भूमिपूजन
पाचोरा (प्रतिनिधी) : दि
मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना अंतर्गत रस्ता कामाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम शुक्रवार, दि. ०१ मे २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता जिल्हा परिषद शाळा, पहाण (ता. पाचोरा, जि. जळगाव) येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार किशोर आप्पा पाटील हे राहणार असून, प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हाधिकारी रोहन घुगे, मा. करिश्मा नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद जळगांव,उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे,तहसीलदार विजय बनसोडे,गटविकास अधिकारी सुधाकर मुंढे,पोलिस निरीक्षक राहुल कुमार पवार,जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील,बांधकाम विभागाचे उपअभियंता सतीश शिसोदे,माजी जिल्हा परिषद सदस्य पद्मसिंग पाटील,सुनील पाटील, रविंद्र गीते,मनोज राऊळ हे उपस्थित राहणार आहेत.
सदर रस्ता कामामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, शेतीसाठी आवश्यक दळणवळण सुलभ होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमास परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

























