Home महाराष्ट्र अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा जणांना पोलिस महासंचालका तर्फे पोलिस पदके जाहीर, जिल्हा पोलिस...

अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा जणांना पोलिस महासंचालका तर्फे पोलिस पदके जाहीर, जिल्हा पोलिस दलाची मान उंचावलेली असतानाच पाथर्डीतील दोन पोलीसांना लाच घेताना रंगेहाथ पकडताच जिल्हा पोलिस अधीक्षक यांची तडका फडकी बदली

अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा जणांना पोलिस महासंचालका तर्फे पोलिस पदके जाहीर, जिल्हा पोलिस दलाची मान उंचावलेली असतानाच पाथर्डीतील दोन पोलीसांना लाच घेताना रंगेहाथ पकडताच जिल्हा पोलिस अधीक्षक यांची तडका फडकी बदली

 

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

महाराष्ट्र पोलीस खात्यात गुणवत्ता पुर्वक सेवा करणाऱ्या पोलिस अधिकारी व अंमलदार यांचा मानसन्मान व गुणगौरव करण्यासाठी राज्याच्या पोलिस महासंचालका तर्फे सन्मान चिन्ह (पोलिस पदक) देण्यात येते.गेल्या वर्षी म्हणजे २०२५ सालात अहिल्यानगर जिल्ह्यातील चांगले काम करणाऱ्या सहा पोलिस अधिकाऱ्यांना राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते साहेब यांनी कर्तव्यदक्ष, धडाकेबाज, धाडशी, निष्कलंकपणे पोलिस खात्यात सेवा केल्या बद्दल मानाची पोलिस पदके जाहीर केली आहेत. यामध्ये प्रामुख्याने अहिल्यानगर जिल्हा अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्मे साहेब,संगमनेर तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण साळुंखे साहेब, पोलिस कल्याण कक्षाचे पोलिस निरीक्षक मुक्तारखान पठाण साहेब,नुकतीच पोलिस निरीक्षक पदी बढती मिळालेले सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गीते साहेब,हवालदार गोविंद गोल्हार साहेब,पोलिस नाईक राजू सुद्रिक,या सहा जणांचा समावेश आहे.पोलीस महा संचालका तर्फे देण्यात येणारे सन्मान चिन्ह हे महाराष्ट्र पोलीस दलातील अत्यंत आदराचे आणि उच्च श्रेणीचे पद मानले जाते.हे पद देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार गृह खात्याच्या विविध कडक नियमानुसार ज्या अधिकाऱ्यांनी गुन्हे तपास, नक्षलवादी विरोधी मोहीम, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, किंवा प्रशासकीय कामात सलग १५ वर्षे कोणत्याही प्रकारची शिक्षा न घेता उत्कृष्ट श्रेणीची सेवा दिली आहे अशाच व्यक्तींची या सन्मान पदकांसाठी निवड केली जाते.संपुर्ण महाराष्ट्र राज्यातून एकुण ८०० पोलीस अधिकारी व अंमलदार यांची या गुण गौरव सोहळ्यासाठी निवड करण्यात आली आहे.त्या सर्वांचा लवकरच सन्मान करण्यात येणार आहे.अहिल्या नगर जिल्ह्यातून एकुण सहा जणांची या सन्मान पदकांसाठी निवड करण्यात आल्याने नगर जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या उत्तम कार्य क्षमतेवर पोलिस खात्यातर्फे चांगलेच शिक्कामोर्तब झाले आहे.या सहा जणांच्या पोलीस सन्मान चिन्ह निवडी बद्दल विषेश पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब,अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे,यांनी या पोलिस अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.हे मानाचे पोलिस पदक मिळवल्या बदल जिल्ह्यातील पोलिस दलाची मान डौलाने उंचावली होती.परंतू अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी येथिल अपघात ग्रस्त वाहन सोडून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलीस हेड काॅंन्स्टेबल बक्कल क्रमांक (२२५३)अभय काकासाहेब लबडे (वय वर्षे ४०)राहणार खंडोबा नगर शेवगाव आणि पोलिस कॉन्स्टेबल बक्कल क्रमांक (१०५३)ज्ञानेश्वर मारूती सानप (वय वर्षे ३६) राहणार माळी बाभुळगाव तारकेश्वर नगर ता.पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.अपघात ग्रस्त वाहनांची सुटका करण्यासाठी या दोघांनी वाहन मालकाकडे १५००० रुपयांची मागणी केली होती.त्यापैकी आठ हजार रुपये तक्रारदार यांनी अगोदरच दिले होते.व राहिलेले सात हजार रुपये मिळण्यासाठी या दोन पोलीसांनी वाहन मालकाकडे सारखाच तगादा लावला होता.शेवटी किमान पाच हजार रुपये तरी द्या अशी मागणी केली होती.या पोलीसांच्या सततच्या पैशाच्या मागणीच्या छळाला कंटाळून वाहन मालकाने नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस पथकाने दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी पाथर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापळा लावला होता.ठरल्या प्रमाणे तक्रारदार हे पाच हजार रुपये घेऊन पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले.या दोन पोलीसांनी पैसे स्विकारताच दबा धरून बसलेल्या नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस पथकाने त्यांना दोघांना रंगेहाथ पकडले.ही कारवाई सुरू असताना पोलिस पथकाने एका कर्मचाऱ्यास ताब्यात घेतले तर दुसरा कर्मचारी पोलीसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला.फरार झालेल्या कर्मचाऱ्यांचा पोलिस कसून शोध घेत आहेत. या बाबतची घटना अशी की तक्रारदार यांचा मढी गावाजवळ ६ मार्च रोजी बुलेट मोटार सायकलचा अपघात झाला होता.त्या अपघातील बुलेट चालक यांना दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी २४ एप्रिल रोजी तक्रारदार यांच्या विरोधात पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये अपघाताची फिर्याद दाखल केली होती.त्या संदर्भात बीट हवालदार अभय काकासाहेब लबडे यांनी तक्रारदार यांना दिनांक २८ एप्रिल रोजी पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये बोलाउन घेऊन त्यांची गाडी पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये जमा करून घेतली होती.सदर गाडी सोडविण्या साठी तक्रारदार यांच्या ऐवजी लायसन्स वाला ड्रायव्हर अपघातातील तपासात दाखविण्या साठी व पुढे कोर्टातील कामकाजात मदत करण्यासाठी तक्रारदार यांच्या कडे सात हजार रुपयांची मागणी केली होती.त्यावरून दिनांक २९ एप्रिल रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता पोलिस कॉन्स्टेबल लबडे यांनी किमान पाच हजार रुपये तरी द्या असे म्हणून पाच हजार रुपये स्विकारण्याचे मांन्य केले होते.लगेचच सापळा कारवाई चे आयोजन केले असता आरोपी लोकसेवक यांनी पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये बीट अंमलदार कक्षात लाचेची पाच हजार रुपयांची रक्कम तक्रारदार यांच्या कडून पंचा समक्ष स्विकारल्या नंतर त्यांनी ती रक्कम त्यांचे बीट मदतनीस ज्ञानेश्वर मारूती

सानप यांच्या कडे दिली.सदरची कारवाई ही नाशिक विभागाचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उप अधीक्षक सुरेश शिरसाट यांच्या पथकातील पोलिस कॉन्स्टेबल संजय ठाकरे,पोलिस कॉन्स्टेबल योगेश शिंदे,यांनी पोलिस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी,सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली.ही कारवाई होताच अहिल्या नगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांची मुंबई येथे तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.त्यांच्या जागी चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची अहिल्यानगर येथे नियुक्ती करण्यात आली आहे.त्यामुळे पोलिस खात्याची लक्तरे चांगलीच महाराष्ट्राच्या वेशीवर टांगली गेली आहेत.एकीकडे चांगल्या कामाबद्दल राज्याच्या पोलिस महासंचालका कडून जिल्ह्यातील सहा पोलिस अधिकाऱ्यांना पोलिस पदके जाहीर झाली आणि त्याच जिल्ह्यातील दोन पोलिस लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.पोलीस खात्याचा हा केवढा मोठा विरोधाभास आहे. जिल्ह्यातील सर्व सामान्य लोकांना न समजणारे हे एक फार मोठे कोडेच निर्माण झाले आहे.जिल्ह्यातील पोलिस दलात “कयी खुशी,कभी गम”अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अहिल्या नगर जिल्ह्यातील सहा पोलिस अधिकाऱ्यांना जाहीर झालेल्या पोलिस पदकामुळे पोलिस खात्याची मान उंचावली होती पण पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये झालेल्या दोन पोलिसांवरील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाई मुळे पोलिस खात्याची मान अत्यंत शरमेने खाली गेली आहे.जिल्ह्यातील पोलीसांनी याचा चांगलाच बोध घेतला पाहिजे.पोलीस दलात ईमाने इतबारे चाकरी केली पाहिजे हिच अपेक्षा सामान्य नागरिक करीत आहेत.

Don`t copy text!