जळगाव येथे 14 जून रोजी डाक अदालतीचे आयोजन

जळगाव येथे 14 जून रोजी डाक अदालतीचे आयोजन

जळगाव, दिनांक 4 – पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे निराकरण सहा आठवड्यांच्या आत झालेले नाही. अशा तक्रारींच्या निराकरणासाठी अधिक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव येथे दि. 14 जून, 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे.
तरी नागरिकांनी आपल्या तक्रारी संपूर्ण माहितीसह दोन प्रतित अधिक्षक, डाकघर कार्यालय, पहिला मजला, हेड पोस्ट ऑफिस बिल्डींग, जळगाव-425001 या पत्त्यावर दि. 10 जून, 2021 पुर्वी पोहोचेल अशाबेताने पाठवावी. मुदतीनंतर आलेल्या तक्रारींचा निपटारा केला जाईल, परंतु डाक अदालतीत समावेश केला जाणार नाही. असे अधिक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.