Home महाराष्ट्र मुंबई-पुणे या मिसिंग लिंक रोडला “हुतात्मा शिंग्रोबा धनगर मार्ग” असे नाव द्यावे...

मुंबई-पुणे या मिसिंग लिंक रोडला “हुतात्मा शिंग्रोबा धनगर मार्ग” असे नाव द्यावे म्हणून शेवगाव-पाथर्डीतील सकल धनगर समाजाचे मुख्यमंत्र्यांना साकडे

मुंबई-पुणे या मिसिंग लिंक रोडला “हुतात्मा शिंग्रोबा धनगर मार्ग” असे नाव द्यावे म्हणून शेवगाव-पाथर्डीतील सकल धनगर समाजाचे मुख्यमंत्र्यांना साकडे

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

मुंबई-पुणे या मिसींग लिंक रोडला हुतात्मा शिंग्रोबा धनगर मार्ग असे नाव द्यावे म्हणून अहिल्या नगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघातील सकल धनगर समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना एक निवेदन पाठवून साकडे घातले आहे.सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की सदरचा रस्ता हा सद्य स्थितीत मुंबई पुणे मिसिंग लिंक रोड या नावाने ओळखला जातो.परंतु त्या रस्त्याच्या संदर्भात एक ऐतिहासिक व प्रेरणादायी घटना सांगितली जाते की शिंग्रोबा धनगर हे एक धाडसी व देशभक्तीने भारावलेले व्यक्तीमत्व होते.इंग्रजांच्या काळात त्यांनी प्रथम इंग्रजांना हा रस्ता दाखवला होता.त्या बदल्यात इंग्रजांनी त्याला बक्षीस विचारले असता त्यांनी सांगितले की मला माझ्या साठी काहीही नको परंतु मला “माझ्या देशासाठी स्वातंत्र्य हवे आहे”अशी इंग्रज अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून ही मागणी त्यावेळी शिंग्रोबानी केली होती.त्यांच्या या निर्भीड व देशभक्तीनी भारावलेल्या भुमिकेमुळे इंग्रजांनी शिंग्रोबा धनगर यांच्या वर त्याच ठिकाणी निर्दयीपणे गोळ्या झाडून त्यांना ठार केले होते.अशा प्रकारे देशासाठी ज्या घाटात शिंग्रोबा धनगर यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या घाटातील रस्त्याला “शिंग्रोबा धनगर मार्ग” असे नाव देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.शिंग्रोबा धनगर यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी व भावी पिढीला त्यांच्या देशभक्तीची जाणिव व्हावी यासाठी या मिसिंग लिंक रोड रस्त्याला “हुतात्मा शिंग्रोबा धनगर मार्ग”असे नाव देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशी मागणी संपूर्ण राज्यभर जोर धरू लागली आहे.काही ठिकाणी तर उपोषणही सुरू झाली आहेत. शेवगाव -पाथर्डी तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने या निवेदनावर शेवगाव नगर परिषदेचे भाजपचे स्विकृत नगरसेवक गणेशराव कोरडे, प्राध्यापक विनायक नजन सर,पैलवान छगनराव पानसरे सर,गोपिचंद सोरमारे, सोमनाथ सावळेराम मतकर,बंडू हिराजी मतकर, केशवराव माधवराव फलके, विशाल गिरगुणे, रामेश्वर कोल्हे यांच्या सह्या आहेत.या निवेदनाची प्रत तहसीलदार साहेब यांच्या वतीने शेवगावचे संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार निलेश वाघमारे साहेब यांनी स्विकारली आहे. या निवेदनाच्या प्रती प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी, आणि वरिष्ठांकडे पाठविण्यात आल्या आहेत.या निर्णया संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे नेमकी काय भूमिका घेतात याकडे तमाम महाराष्ट्रातील धनगर समाजातील सर्व सामान्य कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Don`t copy text!