शासनाला जर शेतमालाला हमी भावाचा कायदा करता येत नसेल तर शेतकऱ्यांना किमान कर्जमाफीचा दिलासा तरी दिला पाहिजे : मा.खा.प्रकाशजी आंबेडकर

शासनाला जर शेतमालाला हमी भावाचा कायदा करता येत नसेल तर शेतकऱ्यांना किमान कर्जमाफीचा दिलासा तरी दिला पाहिजे : मा.खा.प्रकाशजी आंबेडकर

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) सरकारने पाच सात वर्षांनंतर शेतकऱ्या वरचा कर्जाचा बोजा कमी करण्याचे धोरण अवलंबिले पाहिजे.एका बाजूला शेतकऱ्यांच्या शेतीमालासाठी हमीभावाचा कायदा होत नाही आणि दुसऱ्या बाजूला कर्ज काढल्या शिवाय शेती होत नाही.अशी आजच्या शेतकऱ्यांची बीकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. शासनाला जर शेतमालासाठी हमीभावाचा कायदा करता येत नसेल तर शेतकऱ्यांना किमान कर्जमाफीचा तरी दिलासा दिला पाहिजे असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते मा.खा.प्रकाशजी आंबेडकर यांनी व्यक्त केले.ते अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील आदर्श गाव वडुले येथील मागासवर्गीय कर्जबाजारी शेतकरी बाबासाहेब सुभाष सरोदे यांनी कर्जबाजारी पणाचा व्हिडिओ प्रसारित करून नुकतीच आत्महत्या केली होती. त्या मयताच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे सांन्तवन करण्यासाठी राष्ट्रीय नेते मा.खा.प्रकाशजी आंबेडकर हे नेवासा तालुक्यातील वडुले येथे आले होते.त्यावेळी ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे विचार व्यक्त केले.आंबेडकर साहेब पुढे म्हणाले की जसे इंडस्ट्रीयल कंपनीला सरकार तर्फे सबसिडी दिली जाते त्या प्रमाणे शेतकऱ्यांचे जे कर्ज आहे ते माफ करण्याची भूमिका शासनाने घेतली तर निश्चितच शेतकरी हा त्याच्या पायावर उभा राहुन जगू शकतो.आत्महत्या ग्रस्त कर्जबाजारी झालेला मयत शेतकरी बाबासाहेब सुभाष सरोदे यांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी म्हणून मी अहिल्यानगरचे कलेक्टर आणि महाराष्ट्र शासनाशी बोलेन.तसेत मयत सरोदे कुटुंबीतील तिन मुलांची शिक्षणाची जबाबदारी ही शासनाने घेतली पाहिजे.हा काय मोठा बोजा आहे असे मी मानत नाही असे त्यांनी सांगितले.तसेच या कुटुंबाला शासकीय योजनेत बसवून हे सर्व केले पाहिजे.महात्माफुले महामंडळ,अण्णाभाऊ साठे महामंडळ या दोन्ही महामंडळा मार्फत या घरातील कुटुंब प्रमुखाला आर्थिक मदत मिळाली तर हे कुटुंब स्थीर स्थावर व्हायला निश्चितच मदत होईल. अशा परिस्थितीत राज्यांमध्ये ज्या सरकारी योजना चालल्या आहेत त्या योजनेमध्ये या कुटुंबाचा समावेश करून घ्यावा लागेल.मग या कुटुंबाला धीर आणि आधार मिळेल.सरकारी योजनेत बसवल्यास या आपदग्रस कुटुंबाला निश्चितच आर्थिक मदत मिळेल असा विश्वास राष्ट्रीय नेते प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी व्यक्त केला.त्यांनी सरोदे कुटुंबीतील व्यक्तींच्या दुःखात स्वतःला सहभागी करून घेतले.त्यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी विषयक धोरणावर सडकून टीका केली.शेतकऱ्या साठी नुसत्या घोषणा न करता सरकारने ठोस अशी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या शेतकरी विषयक घोषणाबाजी वर ही टीका करताना त्यांनी असे सांगितले की सरकार नुसत्या घोषणा करतय पण शेतकऱ्यांच्या आयुष्यात खरोखरच बदल घडवणारी कोणतीही ठोस मदत केली जात नाही ही अतिशय वेदनादायी स्थीती आहे असा आरोप त्यांनी केला.या वेळी आदर्श गाव वडुले येथील शेतकऱ्यांनी ही आपल्या दैनंदिन संकटाबाबद आंबेडकर यांच्याशी संवाद साधला.या वेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्यासह अनेक तालुक्यांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यामध्ये प्रामुख्याने वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते प्राध्यापक किसनराव चव्हाण, अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष विशाल कोळगे, महासचिव अनिल जाधव,राहुरी तालुका अध्यक्ष संतोष चोळगे,श्रीरामपूर तालुका अध्यक्ष चरण त्रिभुवन,नेवासा तालुका अध्यक्ष पोपट सरोदे, युवाअध्यक्ष प्रवीण आल्हाट,युवा महासचिव सुनिल वाघमारे,बाबासाहेब आल्हाट,राजू साळवे, ब्राह्मणे सर,विजय गायकवाड,संतोष कासोदे,योगेश गायकवाड,दिपक सरोदे,उत्तम बोर्डे,राजू पठारे,किशोर भारस्कर,सागर गायकवाड,सागर चक्रनारायण,आकाश इंगळे,सचिन इंगळे, शिवाजी म्हस्के,अशोक मिसाळ,सचिन साठे, नितीन गोर्डे,संजय बनसोडे,भाऊसाहेब जगदाळे,संजय गोर्डे, शंकरराव भारस्कर,सलीम इनामदार यांचा समावेश होता.मा.खा.प्रकाशजी आंबेडकर हे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी रवाना झाले.