जागतिक छायाचित्रण दिन निमित्त छायाचित्रकार यांच्या युवा सेने तर्फ सत्कार

जागतिक छायाचित्रण दिन निमित्त छायाचित्रकार यांच्या युवा सेने तर्फ सत्कार

 

पाचोरा (प्रतिनीधी)जागतिक छायाचित्रण दिन…दहा-पंधरा वर्षांपूर्वी कॅमेऱ्यातून टिपलेले छायाचित्र हातात पडण्यासाठी पंधरा दिवस वाट पाहावी लागत असे. काळ बदलला अन् छायाचित्रणाची माध्यमेही बदलत गेली. रोलचा कॅमेरा, डिजिटल कॅमेरा ते मोबाइल… टिपलेले छायाचित्र काही सेकंदांत पाहता, हाताळता येऊ लागले. तथापि, या कलेतली रोचकता मात्र कायम राहिली आहे. फोटो काढण्यासाठीची एक्साइटमेंट आजही तशीच आहे. १९ ऑगस्ट हा दिवस जागतिक छायाचित्रण दिन म्हणून साजरा केला जातो. कारण, या दिवशी सन १८३९ साली फ्रेंच सरकारने फोटोग्राफीचे पेटेंट विकत घेऊन जगाला मुक्त केले. काही वस्तू प्रकाश आणि अंधाराचा खेळ यामुळे बदलतात. या साध्या तत्त्वातून साधारण सन १८०० मध्ये कॅमेरा ही कल्पना विचारात आली. १८३९ च्या दरम्यान व्यावसायिक छायाचित्रकलेचा जन्म झाला. जोसेफ निकफेर निएपेस यांनी सर्वात पहिला फोटो काढल्याचे सांगितले जात आहे. जोसेफ यांनी १९२६ ते १९२७ दरम्यान फ्रान्सच्या बरगंडी प्रदेशातील ‘द ग्रास’ येथील एका खिडकीतून दिसणाऱ्या दृश्याचे पहिले छायाचित्र टिपले होते. छायाचित्रकार दिनानिमित्त आज पाचोरा शहरातील छायाचित्रकार दौलतराम वाधवणी, राम भाई वाधवणी, कन्हैया भाई वादवानी, सोमेश्वर भाऊ, यांना पुष्पगुच्छ देऊन मित्र परिवारातर्फे. सत्कार करण्यात आले यावेळी संदीप जैन फकिरचंद पाटील लालबाग राजाचे अध्यक्ष राहुल जैन प्रशांत सोनार व मित्रपरिवार उपस्थित होते