Home पाचोरा गौमाता सन्मान अभियाना निमित्त पाचोरा येथील महिलांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

गौमाता सन्मान अभियाना निमित्त पाचोरा येथील महिलांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

गौमाता सन्मान अभियाना निमित्त पाचोरा येथील महिलांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

 

 

आज दिनांक २७ एप्रिल २०२६ रोजी संपूर्ण राष्ट्रभर सुरू असलेल्या गौ सन्मान आवाहन अभियानाच्या पार्श्वभूमीवर, ज्यांच्या प्रमुख संरक्षक म्हणून गौ माता आणि अध्यक्ष म्हणून नंदी बाबा यांचे मार्गदर्शन आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली गौ सेविकांनी माननीय तहसीलदार साहेबांना सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास प्रार्थना पत्र सादर केले.

या प्रार्थना पत्रामध्ये संपूर्ण भारतातील अखिल वेद लक्षणा गौ माता (संपूर्ण देशी गोवंश) यांची विधिवत सेवा, पूर्ण सुरक्षा आणि राष्ट्रीय सन्मान मिळावा, यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा तसेच गोपालन मंत्रालयाची स्थापना करावी, अशी संपूर्ण भारतवासियांच्या वतीने नम्र विनंती करण्यात आली.

गौ सेवा, सन्मान आणि सुरक्षा यासाठी हे निवेदन देण्यात आले. या प्रार्थना पत्रासोबत सुमारे ३०० स्वाक्षरी केलेल्या पत्रकांचा समावेश करून लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.

या उपक्रमात लिनेस क्लब पाचोराच्या अध्यक्षा प्रा. सौ जयश्रीताई वाघ, सौ.प्रिया लाहोटी, कु.चेतना हिरे तसेच माहेश्वरी समाजाच्या ज्येष्ठ भगिनी यांनी पुढाकार घेत आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले.

Don`t copy text!