श्री.गो.से. हायस्कूल पाचोरा येथे कर्तव्यपूर्ती सोहळा संपन्न

श्री.गो.से. हायस्कूल पाचोरा येथे कर्तव्यपूर्ती सोहळा संपन्न.

पाचोरा ( प्रतिनिधी)
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से.हायस्कूल पाचोरा येथे कार्यरत असलेले शिपाई नाना त्रंबक साळवे हे 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून आज सेवानिवृत्त झाले.
या कर्तव्य पुरती सोहळ्याच्या निमित्ताने त्यांचा शाळेतर्फे शालेय समिती चेअरमन खलील देशमुख व मुख्याध्यापिका सौ.पी. एम. वाघ यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी खलिल देशमुख, सौ.पी.एम.वाघ , पर्यवेक्षक ए.बी.अहिरे, आर. बी. बोरसे यांनी नाना साळवे यांच्या प्रामाणिक कार्याचा गौरव करून त्यांना सेवापुर्तीनंतरच्या आरोग्यदायी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास उपमुख्याध्यापक एन. आर ठाकरे पर्यवेक्षक आर. एल.पाटील, तांत्रिक विभाग प्रमुख श्री.एस.एन.पाटील सर, कार्यालयीन प्रमुख अजय सिनकर सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू,भगिनी व नाना साळवे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्वल पाटील व आभार प्रदर्शन एम. एन. देसले यांनी केले.