पाटील विद्यालयात ध्वजारोहण
भडगाव:- येथील सौ सुमनताई गिरधर पाटील माध्यमिक व सौ जयश्री गणेश पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय ,उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम,जिजाऊ प्राथमिक विद्यालय या विभागातील ध्वजारोहण मुख्याध्यापक/प्राचार्य अजयजी अहिरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी उच्च माध्यमिक व्यवसाय विभाग चेअरमन विजयजी देशपांडे,ज्येष्ठ संचालिका श्रीमती जयश्री पूर्णपात्री,उपमुख्याध्यापिका,श्रीमती छाया बिऱ्हाडे ,उपप्राचार्य संदीपजी सोनवणे ,पर्यवेक्षक अशोक तायडे, शरद महाजन,ज्येष्ठ सेवानिवृत शिक्षिका श्रीमती आर जे कोसोदे,कार्यालय अधिक्षक डी एस सोनवणे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ५ वी ते ९ वी,११ वी निकाल वाटप करून उपस्थित पालकांसमक्ष गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.पालकांनी शालेय प्रशासन व गुणात्मक प्रगतीबाबत कौतुक करून समाधान व्यक्त केले.चहा पाण्यानंतर कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.कार्यक्रम यशस्वितेसाठी क्रीडाशिक्षक एस एम भोसले,एन के सोनजे यांनी परिश्रम घेतले.
























