श्री.सु.भा. पाटील प्राथमिक विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी” सेंट्रल बोर्ड ऑफ आयटी अँड प्रोफेशनल ट्रेनिंग” संचलित ‘मॅथ्स जीनियस ओलंपियाड” स्पर्धेत घवघवीत यश संपादन
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.सु.भा. पाटील प्राथमिक विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी” सेंट्रल बोर्ड ऑफ आयटी अँड प्रोफेशनल ट्रेनिंग” संचलित ‘मॅथ्स जीनियस ओलंपियाड” स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे
इयत्ता दुसरी- मोहित महाजन, हर्ष मोरे, यज्ञेश मराठे, यशश्री जगताप, प्रांजली पाटील, तनेश पाटील, वंश सुतार, यशराज गढरी,
इयत्ता तिसरी -यशश्री राजपूत, यती वाघ ( लक्ष्मी वाघ) , वैदेही महाजन, , कीर्ती पाटील,शिवन्या नलावडे ,केतन वडनेरे, मोहित गढरी, स्वयंम दावभट
इयत्ता चौथी- दिवेश देसले, जयेश राजपूत, हरीश जाधव, पूर्वी पाटील, सिमरन धाडी ,शिवानी पाटील, तन्वी चव्हाण ,वेदिका नागरगोजे ,मयंक सुतार ,कुणाल चव्हाण.
या सर्व विद्यार्थ्यांना गोल्ड,सिल्वर ,ब्रांझ मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष भाऊसो.दिलीप वाघ, चेअरमन नानासो.संजय वाघ, मानद सचिव अँड. दादासो.महेश देशमुख, व्हाईस चेअरमन नानासो. व्ही.टी.जोशी,शालेय समिती चेअरमन बापूसो.जगदीश सोनार व सर्व संचालक ,शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. उज्वला साळुंखे मॅडम व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी मनःपूर्वक अभिनंदन व कौतुक केले आहे…

























