पाथर्डी तालुक्यातील मीरी,कासार पिंपळगाव, तिसगाव जिल्हा परिषद गटात वाघांचा धुमाकूळ,वन अधिकारी हतबल,वाघांचा बंदोबस्त करण्याची नागरीकांची मागणी

पाथर्डी तालुक्यातील मीरी,कासार पिंपळगाव, तिसगाव जिल्हा परिषद गटात वाघांचा धुमाकूळ,वन अधिकारी हतबल,वाघांचा बंदोबस्त करण्याची नागरीकांची मागणी

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव,मीरी, कासार पिंपळगाव जिल्हा परिषद गटातील अनेक गावात वाघांनी धुमाकूळ घातला असून सर्व सामान्य नागरिक हैराण झाले आहेत.वाघाच्या वाढत्या हल्ल्यामुळे वन कर्मचारी ही हतबल झाले आहेत.जवखेडे खालसा येथे आदिनाथ वाघ,भरत मतकर,ज्ञानेश्वर मतकर,अमोल मतकर,आदिनाथ मतकर, शिवाजीराव नेहुल,कासार पिंपळगाव येथे बाबासाहेब राजळे,अनिल राजळे,कचरु पवार,यांच्या पशुधनावर हल्ला करून बिबट्या ने फडशा पाडला आहे.कासार पिंपळगाव शिवारात पारेवाडी रस्त्यावर मोहरी येथील मेंढपाळ भाऊसाहेब गणपत नरोटे हे शेतात मेंढ्याचा कळप घेऊन चारण्यासाठी आलेले असताना रात्री येवून यांच्या कळपातील मोठी मेंढी वाघाने ओढून नेत फडशा पाडला आहे.तसेच मीरी,लोहसर, खांडगाव,हनुमान टाकळी,कोपरे, कामत शिंगवे, आडगाव,चितळी, पाडळी,दिंडेवाडी,आव्हाणे, फलकेवाडी, वडुले,वाघोली,या परीसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. शेतातील पिकास पाणी देण्यास,कापुस वेचणी करण्यास शेतात जायला शेतकरी आणि शेतमजूर तयार नाहीत.लांबच्या वस्ती वरून गावातील शाळेत यायला विद्यार्थी तयार नाहीत. अनेक गावांतील ग्रामस्थ वाघाला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी करतात तर वन कर्मचारी सांगतात आम्हाला पिंजरा लावण्याचे वरीष्ठ पातळीवरून आदेशच नाहीत. वन अधिकारी मग नेमके काय करतात हा सर्व सामान्य लोकांना पडलेला प्रश्न आहे.एखाद्या राजकीय पुढाऱ्यांनी मागणी केली तर लगेचच सदर ठिकाणी पिंजरा लावला जातो.नंतर पुन्हा सांगतात की आम्ही खाजगी संबंधांमुळे पिंजरा लावतो.आणि एखाद्या ठिकाणी जर पिंजरा लावलाच तर त्या पिंजऱ्यात शिकारी पशू पक्षी (शिकार)कोणी ठेवायची या वरून शेतकरी आणि वन कर्मचारी यांच्यात वाद होत आहेत. तालुक्यातील अनेक गावांतील हरणाचे कळप गायब झालेले आहेत.हरीण,ससे,घोरपड यांची राजरोसपणे शिकार केली जाते तेव्हा वन कर्मचारी नेमकं काय करतात या कडे जिल्हा वन अधिकारी यांनी लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री सांगतात जिल्ह्यातील वाघांच्या बंदोबस्तासाठी इतक्या कोटीचा निधी मंजूर झाला.मग तो नेमका गेला कोठे हे एक न समजणारे कोडेच आहे.जर एखादा शेतकरी वनपरीक्षेत्र कार्यालयात तक्रार दाखल करण्यासाठी गेलाच तर सदर कार्यालयात नेमणुकीस असलेले प्रमुख अधिकारी कधीच खुर्ची वर बसलेले दिसत नाहीत.असा सारा सावळा गोंधळ वन परीक्षेत्र कार्यालयात सुरू आहे. तालुक्यातील अनेक गावात बेकायदा राजरोसपणे झाडांची कत्तल केली जाते.अनेक ठिकाणी लाकडाच्या वखारी कोणाच्या आशिर्वादाने सुरू आहेत याचे उत्तर वन खात्याने द्यावे अशी नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे. विजेच्या खांबावरील तारांना झाडांची एखादी फांदी स्पर्श करीत आडवी येत असेल आणि एखाद्या शेतकऱ्यांने ती वन कर्मचारी यांना न विचारताच तोडली तर वनखात्याचे कर्मचारी सदर शेतकऱ्यांना बेकायदा वृक्षतोडीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देतात.असा सारा सावळा गोंधळ वन खात्याच्या कार्यालयात सुरू आहे.वाघाचा त्वरित बंदोबस्त न झाल्यास पाथर्डी आणि तिसगाव येथील वनपरिक्षेत्र कार्यालयावर सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे असा इशाराच वनखात्याला ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.कासार पिंपळगाव येथे वाघाने रात्री ओढून नेलेल्या मेंढपाळाच्या मयत मेंढीचा पंचनामा करण्यासाठी शरमाळे साहेब आणि वनसेवक विष्णू मरकड हे आले असता त्यांनी मेंढपाळांना मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन दिले.तसेच शरमाळे साहेब यांनी या भागांतील अनेक शाळेत जाऊन वाघा पासून च्या बचावासाठी काय काळजी घ्यावी या साठी शालेय विद्यार्थ्यासाठी जनजागृती कॅम्प घेण्यात येणार असल्याचे सांगितले.पाथर्डीतालुक्यात अनेक ठिकाणी होणारी बेकायदा वृक्षतोड थांबली पाहिजे अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी वनखात्याने तातडीने उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक झाले आहे.