चोपडा महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागातील दोन विद्यार्थ्यांची ‘ राष्ट्रीय अन्वेषण संशोधन स्पर्धेसाठी’ निवड

चोपडा महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागातील दोन विद्यार्थ्यांची ‘ राष्ट्रीय अन्वेषण संशोधन स्पर्धेसाठी’ निवड

 

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागातील सिद्धार्थ शेखर ठाकरे आणि पवन मनोज बडगुजर या दोन विद्यार्थ्यांची प्रतिष्ठित राष्ट्रीय संशोधन स्पर्धा ‘अन्वेषण २०२५’ साठी निवड झाली आहे. असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (AIU) आयोजित ही स्पर्धा देशभरातील पदवी ते डॉक्टरेट स्तरावरील विद्यार्थ्यांना त्यांचे नाविन्यपूर्ण संशोधन सादर करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून देते. यावेळी इलेक्ट्रॉनिक्स विभागप्रमुख डॉ. कुणाल गायकवाड म्हणाले, “सिद्धार्थ आणि पवन यांनी संशोधन क्षेत्रात पुढे जाण्याची उत्कृष्ट क्षमता दाखवली आहे. राष्ट्रीय स्तरावरील निवड ही त्यांच्या परिश्रमांचे फलित असून संपूर्ण महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे.” विद्यार्थ्यांच्या या निवडीबद्दल महाविद्यालयात आनंदमयी वातावरणात प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे यांच्या हस्ते दोन्ही विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. तसेच इलेक्ट्रॉनिक्स विभागानेही विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक करत मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल तसेच सार्थ निवडीबद्दल महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डॉ. सौ. स्मिताताई संदीप पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे, उपप्राचार्य प्रा. डॉ. आर. एम. बागुल, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. बी. सूर्यवंशी तसेच समन्वयक डॉ. एस. ए. वाघ यांनी अभिनंदन व कौतुक केले.