पुणे येथे चुलत बहिणीच्या साखरपुड्यास जाणाऱ्या २५ वर्षीय युवतीचा रेल्वेत प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे दुर्दैवी मृत्यू

पुणे येथे चुलत बहिणीच्या साखरपुड्यास जाणाऱ्या २५ वर्षीय युवतीचा रेल्वेत प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे दुर्दैवी मृत्यू

पाचोरा, प्रतिनिधी
पुणे येथे चुलत बहिणीच्या साखरपुड्यास निघालेल्या कोटा (राजस्थान) येथील एका २५ वर्षीय युवतीचा बुरहानपुर ते भुसावळ रेल्वे स्थानकादरम्यान प्रकृती बिघडल्याने रेल्वे प्रशासनानाच्या हलगर्जीपणामुळे जळगाव च्या पुढे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असुन लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्र, पाचोरा येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोटा (राजस्थान) येथील रहिवाशी वाघिषा संजय फोतेदार (वय – २५) ह्या दि. २० जुलै रोजी सकाळी ८ वाजुन ३० मिनिटांनी हजरत निजामुद्दीन (दिल्ली) रेल्वे स्थानकावरुन कर्नाटका संपर्क क्रांती एक्स्प्रेस ने (क्रमांक – १२६३०) डब्बा नंबर बी – ५ सिट क्रंमाक – १ वरुन पुणे येथे चुलत बहिणीच्या साखरपुड्यात सहभागी होण्यासाठी निघाली होती. दरम्यान एक्स्प्रेस ही भुसावळ स्थानकावर आल्यानंतर वाघिषा हिची प्रकृती अचानक बिघडली. वाघिषा हिला अस्वस्थ वाटु लागल्याने तिने तिच्या जवळ असलेली मेडिसिन घेतली.आणि परीवाराशी संपर्क केला असता मेडिकल सुविधा मिळावी म्हणून तीने एसी कोच च्या एडन्डट कडे मागितली असता भुसावळ स्थानकात एका डॉक्टरांनी तपासणी करुन काही औषधी दिली त्यानंतर वाघिषा चा प्रवास सुरू झाला मात्र रेल्वे एक्स्प्रेस मध्ये भुसावळ ते जळगाव दरम्यान कुठे तरी तिची ज्योत मालवली भुसावळ रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाचोरा येथे संपर्क करुन वाघिषा ला उतरविण्याच्या सुचना दिल्या मात्र पाचोरा स्थानकावर गाडी आली खरी मात्र तिला बोगितुन खाली उतरविण्याच्या आधीच तिची काहीच हालचाल होत नव्हते वाघिषा चा दि. २१ जुलै रोजी पहाटे ३ वाजुन ३० वाजता . घटनेची माहिती पाचोरा काॅंग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांना कळताच सचिन सोमवंशी हे तात्काळ रेल्वे स्थानकावर दाखल झाले. वाघिषा हिला लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्र, पाचोरा चे हेड कॉन्स्टेबल मधुसूदन भावसार, आर. पी. एफ. पाटील, रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशल हॉस्पिटल नेण्यात आले . मात्र वाघिषा हिची प्राणज्योत मालवली होती. सचिन सोमवंशी यांनी तात्काळ वाघिषा हिच्या परिवारास घटनेची माहिती कळविल्यानंतर वाघिषा हिचे वडिल, आई हे पुण्याहुन पाचोरा येथे दाखल झाले असता त्यांनी एकच हंबरडा फोडला. घटनेप्रकरणी लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्र, पाचोरा येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास चाळीसगाव चे ए. पी. आय. किसन राख यांच्या मार्गदर्शनाखाली ए. एस. आय. ईश्वर बोरुडे हे करीत आहे. दरम्यान जर रेल्वे विभागाच्या कमर्शियल विभागाने गांभीर्याने वाघिषाला भुसावळ येथे उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये दाखल केले असते तर कदाचित तिचा जीव वाचला असता असता. प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळेच तिचा मृत्यू झाल्याचे तिचे नातेवाईक आरोप करीत होते या घटनेत जर वातानुकूलित डब्यातील व्हीआयपी प्रवाशांची ही परिस्थिती तर सामान्य प्रवाशाचे काय असा प्रश्न उपस्थितीत होतो. वाघिषा च्या मृत्यूस जबाबदार अधिकारी यांची चौकशी करून तात्काळ कारवाई करा अशी मागणी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली असून रेल्वे मंत्रालयाकडे याचा पाठपुरावा करण्यात येईल असे ते म्हणाले.