मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या राहुरीतील सभेच्या दिवशी जवळ गावठी कट्टे बाळगणाऱ्या घोडेगाव- शनि शिंगणापूर येथिल दोन जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या राहुरीतील सभेच्या दिवशी जवळ गावठी कट्टे बाळगणाऱ्या घोडेगाव आणि शनि शिंगणापूर येथिल दोघांच्या अहिल्या नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत.त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.अहिल्या नगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या राहुरी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना जिल्ह्यातील गावठी कट्टे जवळ बाळगणाऱ्या आणि गुन्हेगारी कारवाया करणाऱ्यांची माहिती काढून कडक कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या.त्या नुसार त्यांनी जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे एक पोलीस पथक तयार केले होते. त्या पोलिस पथकात महिला पोलिस अंमलदार सोनल भागवत, अरुण मोरे, भगवान थोरात, विशाल तनपुरे,रमिझराजा आतार,रिचर्ड गायकवाड, आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक संदिप मुरकुटे यांचा समावेश होता.या सर्वांचे एक खास पोलीस शोध पथक तयार केले होते.राहुरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भाजपचे दिवंगत आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांच्या विधानसभा पोट निवडनुक प्रचाराची सोमवार दिनांक २० एप्रिल रोजी जाहीर सभा होणार होती.त्या अनुषंगाने जिल्ह्यातील पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.त्याच दिवशी राहुरी येथे हे पोलीसांचे शोध पथक गावठी कट्टे बाळगणाऱ्यांची माहिती काढत असताना त्यांना १)विशाल वसंत पालवे (वय वर्षे २८), राहणार झापवाडी रोड, घोडेगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर,२) सोमनाथ भानुदास मोरे ,(वय वर्षे ३२), राहणार,शनि शिंगणापूर, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर,हे दोघे राहुरी जवळील गोटुंबे आखाडा ते शनि शिंगणापूर रस्त्यावर पांढऱ्या रंगाच्या गाडी मध्ये बसून विना परवाना गावठी कट्टे जवळ घेऊन राजरोसपणे मोकाट फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीसांनी पाठलाग केला असता त्यांना ते संशयित वाहन उंबरे,तालुका, राहुरी,जिल्हा अहिल्यानगर येथील हाॅटेल माउली परीसरात थांबलेले दिसुन आले होते.पोलीसांनी सदर वाहनांची तपासणी केली असता त्यांना त्या वाहनात वरील दोघे इसम संशयित रित्या बसलेले आढळून आले.त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या नावा गावाची चौकशी केली असता त्यांनी आपली वरील नावे पोलीसांना सांगितली. पंचासमक्ष त्यांची झाडा झडती घेतली असता त्यांच्या कडे तीस हजार रुपये किंमतीचा एक गावठी कट्टा,दोन हजार रुपये किंमतीचे एक जिवंत काडतुस, आणि एक मीस फायर झालेलं एक काडतुस, आणि वीस हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल, तसेच पाच लाख रुपये किंमतीची सुझुकी एक्स एल सीक्स ही कार गाडी असा एकूण ५ लाख ५२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता.या संदर्भात अहिल्या नगर जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल बक्कल क्रमांक (२६४६) भगवान बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ३९७/२०२६ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.नेमकी याच दिवशी मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार होती त्या सभेत काही गैरप्रकार करण्याचा या दोघांचा उद्देश होता की काय याचा पोलिस कसुन शोध घेत आहेत.राहुरी तालुका भर एवढी झेड दर्जाची सुरक्षा असतानाही गावठी कट्टे बाळगणाऱ्यांना त्यांचं काहीच भय वाटत नव्हते.जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे कसे धिंडवडे निघाले आहेत हे या घटनेवरून दिसून येते.वेळीच जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सतर्क राहून या दोघांच्या मुसक्या आवळून गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे जिल्हा भर कौतुक होत आहे. नगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत अजूनही विना परवाना गावठी कट्टे जवळ बाळगणाऱ्यांची संख्या वाढत आहे.त्यांनाही आवर घालण्या साठी पोलीसांनी वेळीच उपाय योजना करणे अत्यंत गरजेचे आहे.























