पिंपळगाव उर्दू शाळा अध्यक्ष पदी शेख तालीब कुतबोद्दीन

पिंपळगाव उर्दू शाळा अध्यक्ष पदी शेख तालीब कुतबोद्दीन

उर्दू शाळेत शिकणारे विद्यार्थ्यांची तळमळ रखणारे तसेच त्यांचे हक्कासाठी लढणारे शेख तालिब कुतबोद्दीन यांची चौथ्यांदा जि. प उर्दु शाळा पिंपळगाव हरे येथे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी निवड झालेली आहे. काही ठिकाणी लोक शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपद साठी तसेच सदस्य बनण्यासाठी आपापसात लढतात, भांडणे करतात,काही ठिकाणी सुव्यवस्था कायम ठेवणेसाठी पोलिसांनाही बोलवण्याची गरज पडतो. पण पिपळगाव हरेश्वर गावाची उदाहरण एक अनोखी उदाहरण आहे. पिंपळगाव येथे अध्यक्ष शेख तालिब यांच्यावर पालक वर्ग तसेच लोकांचे एवढे प्रेम आहे की तो शाळेची प्रगतीसाठी वेळोवेळी शेख तालीब यांना निवडून शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बनवतात. साल 2010 मध्ये शासन निर्णय नुसार समिती बनण्याचे सुरुवात झाल्यापासून तो दोन वेळी सदस्य तसेच एक वेळी उपाध्यक्ष ही राहिलेले आहे. आता चौथ्यांदा अध्यक्षपद वर निवड झालेली आहे. त्यांच्या अध्यक्ष बनल्याने गावात आनंदचा वातावरण आहे.