Home महाराष्ट्र पारध बू येथे कृषी विभागामार्फत खरीप हंगाम जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

पारध बू येथे कृषी विभागामार्फत खरीप हंगाम जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

पारध बू येथे कृषी विभागामार्फत खरीप हंगाम जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

 

पारध, (प्रतिनिधी महेंद्र बेराड) – कृषी विभाग भोकरदन यांच्या वतीने मौजे पारध बू येथे खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर शेतकरी जनजागृती कार्यक्रम, मार्गदर्शन सत्र व विविध कृषी प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास गावातील प्रगतीशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमामध्ये बदलत्या हवामान परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांना आधुनिक व शाश्वत शेती तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. यावेली बीबीएफ (ब्रॉड बेड फरो) पद्धतीने सोयाबीन लागवड, सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता चाचणी, महाविस्तार-ख पचा वापर, एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाची खबरदारी, तसेच हुमणी किडीचे नियंत्रण व व्यवस्थापन या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमात उप कृषी अधिकारी श्री. विनोद जाधव यांनी बियाणे उगवण क्षमता चाचणी, बीज प्रक्रिया कशी करावी या वर मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करावी, असे आवाहन केले.

सहाय्यक कृषी अधिकारी श्री. अभिमन्यू भगत यांनी एल निनोमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा विचार करून कमी कालावधीत येणारी व कमी पाण्यावर तग धरणारी पिके आणि वाणांची निवड करण्याचे महत्त्व सांगितले, त्यांनी शेतकऱ्यांना हवामान आधारित शेती नियोजन करण्याचे आवाहन केले. यावेळी श्री. विनायक दळवी यांनी बीबीएफ पद्धतीच्या माध्यमातून पावसाच्या अनियमिततेमध्ये पाण्याचे योग्य व्यवस्थापन, जमिनीची सुपीकता राखणे आणि उत्पादनवाढ साध्य करण्याबाबत माहिती दिली.

यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी श्री. सुमित राहते यांनी सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता चाचणीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले. बियाण्यांची गुणवत्ता तपासल्यास पेरणीनंतर होणारे नुकसान टाळता येते व योग्य रोपसंख्या मिळते, असे त्यांनी सांगितले. तसेच महाविस्तार-ख पच्या माध्यमातून कृषीविषयक तांत्रिक माहिती, हवामान अंदाज, विविध योजना व पीक व्यवस्थापनाची माहिती शेतकऱ्यांना घरबसल्या उपलब्ध होत असल्याचे सांगून प्चा वापर करण्याचे आवाहन केले.

हुमणी किडीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना किडीची ओळख, जीवनचक्र व नियंत्रणाच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांनी यावेळी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. कार्यक्रमास उपस्थित शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या या उपयुक्त उपक्रमाचे स्वागत केले. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी मिळालेल्या मार्गदर्शनामुळे आगामी हंगामात योग्य नियोजन करण्यास मदत होणार असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

 

Don`t copy text!