माऊलीचे विश्वातील वास्तव्य चित्ररूपात श्री.गो से. हायस्कूलमध्ये साकारले

माऊलीचे विश्वातील वास्तव्य चित्ररूपात श्री.गो से. हायस्कूलमध्ये साकारले

अवघे विश्वची माझे घर”हे संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथातील एक प्रसिद्ध ओवी आहे. याचा अर्थ , “संपूर्ण विश्व हेच माझे घर आहे आणि यावरील प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक वस्तू माझ्यासाठी कुटुंबासारखी आहे, किंवा मी सगळ्या विश्वाला आपले मानतो.

विश्वाच्या प्रत्येक अणू रेणू मध्ये माझ्या विठू माऊलीचा वास आहे. म्हणूनच चित्रात असंख्य ग्रह तारे व पृथ्वी दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.मी मंदिरात तर आहेच पण प्रत्येकाच्या मनातसुद्धा वास्तव्य करतो

विश्वामध्ये (universe) अंदाजे 200 अब्ज (2 x 10^11) ते 2 ट्रिलियन (2 x 10^12) आकाशगंगा (galaxies) आहेत, खगोलशास्त्रज्ञांचा अंदाज आहे. विश्वामध्ये सुमारे 100 अब्ज आकाशगंगा आणि प्रत्येक आकाशगंगेमध्ये अंदाजे 100 ते 400 अब्ज तारे आहेत. म्हणजे तेथे तब्बल ४० ट्रिलियन सूर्य असू शकतात. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गो.से हायस्कूल पाचोरा च्या दर्शनी भिंती वरील फलकावर शाळेचे कलाशिक्षक सुबोध कांतायन सरांनी रंगीत खडुच्या माध्यमातून विठू माउलीचे चित्रकृती साकारली.

चित्राकडे बारीक डोळे (किलकिले ) करून बघितल्यास चित्रातील बारकावे, चित्राची depth जाणवते.

आपल्याला आकाशगंगेत भ्रमण केल्याचा भास होतो.जवळचे ग्रहतारे व दूरच्या ग्रहताऱ्यांचा भास होतो. माऊलीच्या रूपात स्क्रबलिंग टेक्चर चा वापर करून रेखीव करण्याचा प्रयत्न केलाय.सुबोध कांतायन सर दरवर्षी वेगवेगळ्या थीमवर विठूमाऊलीच्या रूपाची कलाकृती साकारतात.शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये कला विषयाविषयी आदर व गोडी निर्माण होते. या चित्राचे व्हिडीओ इंस्टाग्राम, व्हाट्सअँप, फेसबुकवर खूप viral होतं आहेत.

पिटीसी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भाऊसो दिलीप वाघ, चेअरमन नानासो संजयजी वाघ,शालेय समिती चेअरमन मा.दादासो.श्री.खलिल देशमुख, तांत्रिक विभाग चेअरमन श्री वासुभाऊ महाजन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एन.आर. पाटील, उपमुख्याध्यापक श्री.आर.एल.पाटील, पर्यवेक्षक सौ.ए.आर. गोहील, श्री.आर.बी.तडवी, श्री. आर. बी. बांठिया, तांत्रिक विभाग प्रमुख श्री. एस. एन. पाटील, किमान कौशल्य प्रमुख श्री. एम. बी. बाविस्कर, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख श्री.एम. टी.कौंडिण्य, कार्यालय प्रमुख श्री.अजय सिनकर, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कांतायन सरांना विविध कलाकृती निर्मितीसाठी प्रोत्साहन व सर्व माऊलीच्या भक्तांना शुभेच्छा दिल्यात.