आ. मोनिकाताई राजळे यांनी दिला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखेरचा निरोप

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) नगर जिल्ह्यातील
शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांनी काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामती येथे जाऊन श्रद्धांजली अर्पण करून विनम्रपणे अभिवादन केले आणि अश्रूपुर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले होते.त्यांच्या अंत्यविधीला संपूर्ण राज्यभरातून फार मोठा जनसागर उसळला होता. अजित दादा पवार यांच्या अखेरच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील चाहत्यांची अलोट गर्दी लोटली असताना ही गर्दीतून वाट काढत पुढे जाऊन आमदार मोनिकाताई राजळे यांनी अजित दादांना पुष्पांजली वाहून अंत्यदर्शन घेतले.माजी आमदार स्वर्गीय राजीवजी राजळे यांना अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी देण्यात अजित पवार यांचा सींहाचा वाटा होता.आमदार राजळे यांनी त्यावेळी बारामती मध्ये थांबून लोकसभेची उमेदवारी मिळवण्या साठी प्रचंड प्रमाणात स्पर्धा असताना ही राजाभाऊ राजळे यांच्या साठी अजित दादा यांच्या मध्यस्थीने लोकसभेची उमेदवारी मिळवली होती.आमदार मोनिकाताई राजळे यांनाही राजकारणाचा प्रथम श्रीगणेशा करताना सर्वात अगोदर अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मीरी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकिट देऊन निवडून आणले होते आणि अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदी निवड करून पद बहाल केले होते . त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या हस्ते वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ ही केला होता.नंतर माजी आमदार राजीवजी राजळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संधान साधून एबी फाॅर्म मिळवत शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघातून भाजपची उमेदवारी मिळवली होती. तेव्हा पासून आजपर्यंत सलग तीन वेळा हॅट्ट्रिक साधली आणि आमदारकी अभेद्य राखण्या साठी विषेश प्रयत्न केले.आता मतदार संघात विकास कामांची जोरदार घौडदौड सुरू आहे.त्या काळी राष्ट्रवादी काॅंग्रेसने अनेक दिग्गज नेते मंडळीचा विरोध झुगारून राजळे परीवाराला बळ देण्यासाठी जोरदार मोहीम राबवली होती. आजही पाथर्डी तालुक्यात राष्ट्रवादी जिवंत ठेवण्यासाठी आमदार मोनिकाताई राजळे यांचे दीर शिवशंकर राजळे हे पाथर्डी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष पदाची धुरा सांभाळत आहेत. तर त्यांच्या सौभाग्यवती योगिता शिवशंकर राजळे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महीला जिल्हा अध्यक्षा पदी विराजमान आहेत.एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेसशी राजळे परीवाराची चांगलीच नाळ जोडलेली आहे.पण काळाच्या ओघात भाजपच्या कोट्यातून उमेदवारी मिळवली आणि आमदार मोनिकाताई राजळे परीवार भाजपमय झाला आहे.

























