आमदार साहेब जरी आपल्यातून गेले असले तरी तरी आम्ही तुम्हाला साथ देवू, तुम्हीही आम्हाला कायमचा मतरूपी आशिर्वाद द्या : प्रियांका कर्डिले

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
राहुरी पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब हे जरी आपल्यातून निघून गेले असले तरी आम्ही तुम्हाला साथ देवू, तुम्हीही आम्हाला कायमचा मतरूपी आशिर्वाद द्या असे वक्तव्य जिल्हा बँकेचे संचालक अक्षय कर्डिले यांच्या सुविद्य पत्नी सौ प्रियांका कर्डिले यांनी केले.त्या अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी येथे महीलांच्या हळदी कुंकू समारंभाच्या निमित्ताने घेतलेल्या “खेळ पैठणीचा”या कार्यक्रमात विजेत्या महीलांना पैठणी साडीचे पारितोषिक वितरण करताना बोलत होत्या.चिचोंडीचे सरपंच श्रीकांत आटकर आणि वांबोरी चारीचे संचालक एकनाथ आटकर हे करंजी गणात गेल्या सात वर्षांपासून दरवर्षी महिला मेळावा घेऊन महीलांना साडी चोळी आणि संक्रांतीचे वाण देऊन सन्मानित करतात. दरवर्षी या कार्यक्रमास दिवंगत आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेब आणि त्यांच्या पत्नी अलकाताई कर्डिले हे दाम्पत्य आवर्जून उपस्थित रहात होते.परंतू आमदार महोदयांचे निधन झाल्यानंतर त्यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले आणि त्यांच्या पत्नी सौ प्रियांका कर्डिले यांनी हा वारसा अविरतपणे पुढे चालू ठेवला आहे. ब्राम्हणी येथील कलाकार गणेश हापसे यांनी ज्या महीलांना खेळ पैठणीचा या कार्यक्रमात विजेत्या म्हणून जाहीर केले त्या विजेत्या महीलांना साडीचोळी आणि हळदी कुंकवा साठीचे वाण म्हणून जेवणाचे ताटाचे बक्षिस सौ प्रियांका अक्षय कर्डिले यांच्या हस्ते देण्यात आले.विजेत्या महीला मध्ये आकांक्षा संदिप दाणवे,अलका पोपट कारखेले, तनुजा अजिंक्य जर्हाड,रोहीणी दत्तू गोरे,शितल श्रीराम खाडे, ऐश्वर्या जर्हाड,मिना घुले, विजया काळपहाड यांच्या सह अनेक महीलांचा समावेश होता.सौ चैताली श्रीकांत आटकर आणि माजी सरपंच सौ अनिता एकनाथ आटकर यांनी आलेल्या सर्व महीलाना हळदी कुंकवाचा मान दिला.भाजपचे नेते अक्षय कर्डिले यांनी ही या कार्यक्रमास हजेरी लावून दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांचा वारसा पुढे चालवत आलेल्या महिला भगिनींना संबोधित केले. तिसगाव जिल्हा परिषद गटाचे भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून घोषणा झालेले नेते कुशलजी भापसे हे आपल्या सौभाग्यवती सह या कार्यक्रमास उपस्थित होते. प्रारंभी एकनाथ आटकर हे स्टेजवर येऊन माईक समोर उभे राहिले असता दिवंगत आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या आठवणी मुळे त्यांना अश्रू अनावर झाले होते.त्यांनी आलेल्या सर्व महीलांना प्रिती भोजन देऊन सन्मानित केले. यावेळी पाथर्डी तालुक्यातून आलेल्या सर्व पत्रकारांचा फेटा आणि रोख स्वरूपात बक्षीस देऊन सन्मान केला.विद्यमान सरपंच श्रीकांत आटकर पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमा साठी चंद्रकला आव्हाड, द्वारकाबाई आव्हाड,इम्रान शेख,बब्बू फिटर,राजू शेख,संजय शिंदे, अक्षय डोळसे, अशोक कांबळे, आदित्य काळपहाड, मीराबाई आव्हाड,आशा जर्हाड,सपना तुपे, ज्योती घोरपडे,रोहीणी घोरपडे,मंगल डमाळे,अनिल आव्हाड,दत्तात्रय शिंदे इत्यादी मान्यवरासह करंजी गणातील अनेक गावांतील महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

























