गो.पु.पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात लालबहादूर शास्री तसेच महात्मा गांधी जयंती संपन्न.

गो.पु.पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात लालबहादूर शास्री तसेच महात्मा गांधी जयंती संपन्न.

कोळगाव ता.भडगाव – कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत गोपीचंद पुना पाटील,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच कला व विज्ञान महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भारत देशाचे महान पंतप्रधान स्व.लालबहादुर शास्त्री जयंती तसेच महात्मा गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य सुनिल पाटील तसेच पर्यवेक्षक ए.एच.पवार यांच्या हस्ते माल्यार्पण करून श्रीफळ वाढवून प्रतिमापूजन करुन दोघा थोर पुरुषांना विनम्र अभिवादन करण्यात आले याप्रसंगी विद्यालय,कनिष्ठ महाविद्यालय तसेच वरिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर,प्राध्यापक-प्राध्यापिका इतर कर्मचारी उपस्थित होते.