मराठा महिलांचा अवमान करणाऱ्या बकाले विरुद्ध न्यायालयीन लढाई लढणाऱ्या वकिलांचा मराठा आत्मसन्मान अभियानांतर्गत शिवछत्रपतींच्या साक्षीने झाला सन्मान!

मराठा महिलांचा अवमान करणाऱ्या बकाले विरुद्ध न्यायालयीन लढाई लढणाऱ्या वकिलांचा मराठा आत्मसन्मान अभियानांतर्गत शिवछत्रपतींच्या साक्षीने झाला सन्मान!

मराठा माता भगिनींबाबत अत्यंत अश्लील लज्जास्पद वक्तव्य करणारा निलंबित पोलीस निरीक्षक किरण बकाले हा गेल्या दीड वर्षापासून गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. त्याच्याविरुद्ध न्यायालयाने पकड वॉरंट काढूनही तो पोलिसांना सापडत नव्हता. त्याची संपत्ती जमा करण्याचा न्यायालयाचा आदेश होईल या भितीने त्यांने दिनांक १५ जानेवारी रोजी जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयात शरण येऊन स्वतःहून अटक करून घेतली. त्याचे विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर जळगाव जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयाने त्याचा तीन वेळा जामीन नाकारलेला आहे आणि तो शरण आल्यानंतर त्याला न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावलेली आहे आज त्याला न्यायालय कस्टडीत पाठवण्यात आलेले आहे या संपूर्ण कायदेशीर लढाईमध्ये जळगाव जिल्हा न्यायालयातील २६ वकील बांधवांनी सातत्याने न्यायालय लढा देऊ बकालेला दोन दिवसाची पोलीस कस्टडी द्यायला भाग पाडले. हा त्या वकिलांनी केलेल्या मेहनतीचा विजय होता. बकाले हजर झाल्यानंतर त्याचे लाभार्थी असलेल्यांनी आम